नाशिकच्या कोविड सेंटरला आहे खास समीर भुजबळ टच !

विभागीय क्रिडा संकुल येथे २९५ बेडचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये रुग्णांच्या लहान, सहान सोयींचाही विचार केलेला असून त्यात खास माजी खासदार समीर भुजबळ `टच` आहे.
sameer Bhujbal
sameer Bhujbal

नाशिक : मेट- भुजबळ नॉलेज सिटी, महानगर पालिका आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या सहकार्याने विभागीय क्रिडा संकुल येथे २९५ बेडचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे.  या सेंटरमध्ये रुग्णांच्या लहान, सहान सोयींचाही विचार केलेला असून त्यात खास माजी खासदार समीर भुजबळ `टच` आहे.

माजी खासदार समीर भुजबळ हे त्यांचे व्यवस्थापनाचे उत्तम कौशल्य आणि विकासकामांसह प्रत्येक प्रकल्पात टिकाऊपणापासून ते सौदर्यापर्यंतचा विचार असलेला दृष्टीकोण असलेले नेते आहेत. नव्या पिढीतील या नेत्याने जिल्ह्यात उभारलेल्या अनेक प्रकल्पांतून त्यांचे वेगळेपण जाणवते. असेच वेगळेपण पणाला लाऊन अतिशय कमी वेळेत त्यांनी येथील स्व. मीनाताई ठाकरे विभागीय क्रिडा संकुलातील कोविड सेंटरची उभारणी केली. त्याचे आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ऑनलाईन उदघाटन केले. 

शहर आणि जिल्ह्यामध्ये कोविड रुग्णांची प्रचंड संख्या लक्षात घेता शहरातील हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाही. कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे हॉस्पिटलचा ताण कमी करण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून या कोविड सेंटरचा पर्यायी व्यवस्था म्हणून उपयोग होणार आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हे नाविन्यपूर्ण सेंटर प्रथमच उभे राहत आहे. या कोविड सेंटर मुळे कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.  

या कोविड सेंटरमध्ये १८० बेडसाठी ऑक्सिजन लाईनची  स्वतंत्र जोडणी केलेली आहे. या ऑक्सिजन लाईनचे मटेरियल सुरत येथून मागवून रात्रंदिवस काम करून ही ऑक्सिजन लाईन उभारण्यात आली. ऑक्सिजन पुरवठ्यासाठी आवश्यक असलेले वेपोरायझर बडोदा (गुजरात) येथून तर  ऑक्सिजनसाठीची ड्युरा सिलिंडर वेल्लूर (कर्नाटक) येथून आणले आहे. पुरेशा ऑक्सिजन साठ्यासाठी आवश्यक असलेले १ केएल  क्षमतेचे ऑक्सिजन टँक पुणे येथून आणले आहे. १८० रुग्णांना सतत पुरेल एवढा ऑक्सिजनचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रुग्णांच्या सोयीसाठी दिल्ली येथून ५० एअर कुलर मागवून या ठिकाणी बसविण्यात आली. 

हा प्रकल्प कार्यन्वीत करण्यासाठी माजी खासदार  भुजबळ यांनी नियोजन केले. अगदी बारीक-सारीक गोष्टींतही त्यानी विशेष काळजी घेतल्याचे दिसते. रुग्णांच्या विरंगुळ्यासाठी वाचनालय व बुद्धिबळ, कॅरम इ. खेळ, कलाप्रेमींसाठी चित्रकलेची व्यवस्था यांसह करमणुकीसाठी तीन मोठे स्क्रीन व दोन दूरदर्शन संच आहेत. चार मोबाईल चार्जर युनिट यांसारख्या सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. मोठ्या स्क्रीनवर सकाळी योगा व प्राणायामचे प्रशिक्षण देण्यात येईल. त्यानंतर मधुर संगीत, चित्रपट, सध्याच्या घडामोडी यासह सायंकाळी आयपीएल क्रिकेटच्या मॅचेस दाखविण्यात येणार आहेत. जेणेकरून रुग्णांचे मनोरंजन होऊन त्यांचा मानसिक ताण कमी होईल. आजाराची भीती दूर होण्यासाठी मदत होईल.

सामाजिक दायित्वातुन उभारलेले आणि ऑक्सिजन बेड्स असलेले हे एकमेव कोविड केअर सेंटर आहे. या ठिकाणी रुग्णांना औषध उपचारासह दोन वेळचे पौष्टिक जेवण, अंडी आणि  नाश्ता, फळांचा रस, चहा, रात्रीचे हळदयुक्त दुध, शुद्ध पिण्याचे पाणी इत्यादी सोयी सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

सध्या कोरोनाचा नाशिकमध्ये होणारा प्रसार चिंतेचा विषय आहे. त्यात नाशिकच्या नागिरकांना दिलासा म्हणून हा उपक्रम केला आहे. तो करताना रुग्ण लवकर बरा व्हावा, त्याचा आत्मविश्वास वाढला  पाहिजे, हा विचार मी केला. त्याला सगळ्यांनी साथ दिली. - समीर भुजबळ, माजी खासदार.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com