देविदास पिंगळेंचा मास्टर स्ट्रोक... सोसायटी संचालकांना दिले विमाकवच!

जिल्हा बँक, बाजार समितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे संचालक व ग्रामपंचायत सदस्यांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. अशा प्रकारे विमा संरक्षण देणारी ही पहिली संस्था ठरली आहे.
Devidas Pingle
Devidas Pingle


नाशिक : जिल्हा बँक, बाजार समितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या (Major roll playig in District bank & APMC) विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे संचालक व ग्रामपंचायत सदस्यांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय (APMC will give insurance cover to 3100 members) बाजार समितीने घेतला आहे. अशा प्रकारे विमा संरक्षण देणारी ही पहिली संस्था ठरली आहे. (It`s kind of first APMC given insurance cover)  जिल्हा बँक तसेच बाजार समितीच्या दृष्टीने अध्यक्ष, माजी खासदार देविदास पिंगळे (Devidas Pingle) यांचा हा राजकीय मास्टर स्ट्रोक ठरला आहे.  

सध्या जिल्ह्यात कोरोनासह साथरोगांनी थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर तीन तालुक्यांतील ग्रामपंचायत सदस्य व विविध कार्यकारी सोसायटी संचालक अशा तब्बल ३१०० जणांना विमाकवच देण्याचा निर्णय नाशिक बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. 

उपसभापती प्रभाकर मुळाणे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी  बाजार समिती सर्वसाधारण सभा झाली. सभेत बाजार समिती आडते व व्यापारी यांच्याकडून वसूलपात्र असणारी मार्केट फी महिन्याच्या ७ तारखेपर्यंत वसूल करण्याबाबत चर्चा झाली. ऐन वेळेच्या विषयात विम्याचा विषय घेण्यात आला. बाजार समितीसंलग्न असलेल्या नाशिक, त्र्यंबक, पेठ या तीन तालुक्यांतील विविध कार्यकारी सोसायट्या व ग्रामपंचायतीत जवळपास ३१०० सभासद आहेत. सदस्यांना पाच लाखाचे विमा कवच देण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. विमा कवचामुळे संबंधित सदस्याचा अपघाती मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये, अपंगत्व आल्यास अडीच लाख रुपये, अपघात उपचारासाठी एक लाख रुपये, अशी रक्कम मिळणार आहे. यामुळे ग्रामपंचायत सदस्यांना यांचा सर्वाधिक फायदा होणार असल्याचे मत संचालक मंडळाने व्यक्त केले आहे. 

या वेळी सभापती देवीदास पिंगळे, उपसभापती प्रभाकर मुळाणे, संचालक दिलीप थेटे, तुकाराम पेखळे, विश्वास नागरे, संजय तुंगार, युवराज कोठुळे, भाऊसाहेब खांडबहाले, श्‍याम गावित, व्यापारी संदीप पाटील, हमाल मापारी प्रतिनिधी चंद्रकांत निकम, विमल जुंद्रे, सचिव अरुण काळे, सहायक सचिव घोलप, लेखापाल अरविंद जैन, निकाळे आदी उपस्थित होते. 

उपचारासाठी एक लाख रुपये 
अंगावर झाड पडणे, विहिरीत पडून मृत्यू, तलावात पडून मृत्यू, सर्पदंश मृत्यू, पाटाच्या पाण्यात बुडून मृत्यू, दुचाकी व चारचाकी वाहन अपघातात मृत्यू झाल्यास विमावकवच असलेल्या व्यक्ती पश्चात वारसास पाच लाख रुपये, अपघाती अपंगत्व आल्यास अडीच लाख रुपये , उपचारासाठी एक लाख रुपये रक्कम मिळण्याची यात तरतूद आहे. 

नाशिक बाजार समितीशी संलग्न असलेल्या विविध कार्यकारी सोसायटी संचालक, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचाही विमा काढण्याचे ठरवले. सर्व संचालकांशी बोलून आजच्या सभेत त्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. आगामी काळात बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांनादेखील विमाकवच देण्याचा मानस आहे. 
- देवीदास पिंगळे, सभापती, बाजार समिती, नाशिक. 
....
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com