डॅा. वसंतराव पवार रुग्णालय बनले कोरोनाग्रस्तांचे संजीवनी केंद्र

कोरोनाचा झपाट्याने होणारा प्रसार आणि रुग्णांना होणारा त्रास या बातम्यांचा सध्या अक्षरशः पाऊस पडतो आहे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येकावर त्याचा ताण आहे. मात्र भर उन्हातही मृगजळ असतेच, याचा अनुभव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयात अनेकांना आला आहे.
MVP Hospital
MVP Hospital

नाशिक : कोरोनाचा झपाट्याने होणारा प्रसार आणि रुग्णांना होणारा त्रास या बातम्यांचा सध्या अक्षरशः पाऊस पडतो आहे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येकावर त्याचा ताण आहे. मात्र भर उन्हातही मृगजळ असतेच, याचा अनुभव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयात अनेकांना आला आहे. याबाबत एका रुग्णाने कृतज्ञता व्यक्त करताना, इथे मला केवळ उपचार नव्हे; कुटुंबासारखी माया देखील मिळाली, असे सांगितले.

यासंदर्भात दिंडोरी येथील डॉ. माधवराव भास्करराव गायकवाड यांनी सोशल मिडीयावर टाकलेली एक पोस्ट अतिशय वेगाने व्हायरल होत आहे. त्याचे घडले असे की, डॉ. गायकवाड यांचे वडील भास्करराव शिवराम गायकवाड (वय ७४ वर्ष) यांची प्रकृती बिघडली. त्यांना ५ एप्रिलला कोरोनाची लक्षण दिसली. त्यामुळे उपचाराचा प्रश्न निर्माण झाला. आंबेदिंडोरी गाव आणि तालुक्याच्या ठिकाणीही उपचारासाठी बेड उपलब्ध होने अवघड झाले होते. मोठा पेच निर्माण झाला होता. त्यांचे वडील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सभासद असल्याने स्वभाविकपणे त्यांना एचआरसीटी आणि रॅपीड अंटींजन चाचणीसाठी आडगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या डॅा. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आणले होते. या रुग्णालयात उपचार मिळत असल्याने कोरोनाग्रस्त व अन्य सर्वच रुग्णांची मोठी गर्दी असते. कुठे उपचार करावे हा त्यांचा विचार सुरु असतांनाच ते कोरोना पॅाझिटिव्ह असल्याचे आढळले. 

कोरोना चाचणी पॅाझिटीव्ह आल्याने कुटुंब चिंतेत होते, मात्र त्यांचे वडील म्हणाले, तुम्ही संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार यांना फोन कर.  त्यांनीही तसेच केले. त्यानंतर काही वेळात ते डॅा पवार रुग्णालयात गेले असात, गेटच्या आत पोहोचताच संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. नानासाहेब पाटील तेथे आधीच हजर होते. त्यांनी लगेच आपल्या सहकारी स्टाफला सुचना केल्या. वडील संस्थेचे जेष्ठ सभासद आहेत, याची माहिती त्यांनी सहकाऱ्यांना दिली. त्यांनी तातडीने त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल केले. त्यांनी ताबडतोब उपचार सुरु केले. पाच सहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, चिटणीस डॉ. सुनिल ढिकले, राष्ट्रवादी कॅांग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार हे स्वतः  पीपीई कीट घालुन कोविड वॅार्डमध्ये जाऊन रूग्णांची विचारपूस व उफचाराची माहिती घेत होते. उपचारात काही त्रुटी आहेत का? याची माहिती घेत होते. त्यांच्या  कोरोनाग्रस्त असलेल्या त्यांच्या वडिलांचा डॅा गायकवाड यांना रोज फोन यायचा,  आज संस्थेचे अध्यक्ष आले होते, आज संस्थेचे चिटणीस आले होते. अमृता पवार यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस केली. संजय फडोळ यांनीही खुप सहकार्य केले. 

खरंच एखाद्या संस्थेच्या सेवाभावी रुग्णालयाचे एव्हढं कृतीशील प्रशासन पहायला मिळाल, त्याचं मला आणि वडिलांना खुप समाधान वाटलं. व्यवस्थापकांपासून तर तर सफाई कामगारांपर्यंत सगळ्या यंत्रणेचे शिस्तबद्ध काम, स्वच्छता आणि नीटनेटकेपणा बघुन रुग्णांना येथे प्रसन्न वाटते. सहा दिवसात वडील पुर्णपणे बरे झाले. त्याचा खुप आनंद वाटला. डॅा वसंतराव पवार रुग्णालय हे कोरोना रुग्णांसाठी संजीवनी केंद्रच आहे, अशी प्रतिक्रीय त्यांनी व्यक्त केली. 
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com