रुग्णालयांना मदत करणाऱ्या लेखापरीक्षकांना सोडणार नाही

रुग्णांची आर्थिक लूट थांबविण्यासाठी महापालिकेने गाजावाजा करत लेखापरीक्षकांची नियुक्ती केली खरी; परंतु लेखापरीक्षक रुग्णालयांना मॅनेज झाले असून, रुग्णांचे नातेवाईक बिल अदा करताना बेपत्ता असल्याचा आरोप मनसेचे नगरसेवक सलीम शेख यांनी करताना लेखापरीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली.
Salim Shaikh
Salim Shaikh

नाशिक : रुग्णांची आर्थिक लूट थांबविण्यासाठी महापालिकेने गाजावाजा करत लेखापरीक्षकांची नियुक्ती केली खरी; परंतु लेखापरीक्षक रुग्णालयांना मॅनेज झाले असून, रुग्णांचे नातेवाईक बिल अदा करताना बेपत्ता असल्याचा आरोप मनसेचे नगरसेवक सलीम शेख यांनी करताना लेखापरीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली. कारवाई न झाल्यास मनसेच्या वतीने मोठे आंदोलन उभारण्याचा ईशारा दिला आहे.

महापालिकेने दीडशेहून अधिक खासगी कोविड सेंटरला शहरात मान्यता दिला आहे. खासगी कोविड सेंटरमध्ये रुग्णांच्या नातेवाइकांची आर्थिक पिळवणूक होऊ नये, यासाठी प्रत्येक बिल तपासणीसाठी लेखापरीक्षकांची नियुक्ती केली आहे. महापालिकेचे लेखापरीक्षक कमी पडत असल्याने शासनाचे बारा लेखापरीक्षकदेखील रुग्णालयांमध्ये बिले तपासणीसाठी लावण्यात आले आहेत. परंतु बिल हातात पडल्यानंतर लेखापरीक्षकांकडे चौकशी केली जाते त्या वेळी बेपत्ता असता, तर वरिष्ठांकडून सूचना आल्याचे कारण देत टाळाटाळ केली जाते. गंगापूर रोडवरील खासगी रुग्णालयात रुग्णांना लाखोंचे बिल हाती देण्यात आल्यानंतर तेवढे पैसे नसल्याने रुग्णांला सोडले जात नसल्याची तक्रार मनसेकडे प्राप्त झाल्यानंतर सलीम शेख यांच्यासह कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धडक दिली. त्या वेळी लेखापरीक्षक आढळून आले नसल्याचा प्रकार समोर आला होता. त्या अनुषंगाने स्थायी समितीच्या सभेत श्री. शेख यांनी विषय चर्चेला आणला. त्या खासगी रुग्णालयाला नोटीस बजावण्याबरोबरच नियुक्त करण्यात आलेल्या लेखापरीक्षकाची चौकशी करण्याचे आश्‍वासन मुख्य लेखापरीक्षक बी. जी. सोनकांबळे यांनी दिले.

चायना मेड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर
प्राणवायुची तात्पुरती गरज भागविण्यासाठी महापालिकेने प्रभाग विकास निधीतून बाराशे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यातील ३१६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर महापालिकेला प्राप्त झाले. परंतु कोरियन कंपनीकडून यंत्रे खरेदी करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात चायना मेड असल्याने नगरसेवक शेख यांनी संशय व्यक्त केला. ज्या चायनामधून कोरोना व्हायरस आला त्या चायना मालावर बहिष्कार घालणे गरजेचे असताना उलट तेथून यंत्रे खरेदी करणे निषिद्ध असल्याचे सांगताना महापालिकेकडून नागरिकांची फसवणूक होत असल्याचा आरोप केला.

भाजपला घरचा आहेर
भाजपचे योगेश हिरे यांनी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यात संवाद नसल्याचे सांगताना रुग्णालयांमध्ये वाईट परिस्थिती असल्याचे नमूद केले. लसीकरण मोहिमेसाठी पुरेसे केंद्र उपलब्ध नसल्याची तक्रार नोंदविताना गंगापूर रोडवर लसीकरण केंद्राची मागणी केली. समीना मेमन यांनी मुलतानपुरा येथे लसीकरण केंद्राची, तर सलीम शेख यांनी सातपूर ईएसआय हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटरची मागणी केली.
....
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com