आमच्या नांदगावला रेल्वेंचा थांबा पूर्ववत करा! - MLA Suhas Kande deemands Railway Stopage at Nandgao | Politics Marathi News - Sarkarnama

आमच्या नांदगावला रेल्वेंचा थांबा पूर्ववत करा!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 16 जानेवारी 2021

रेल्वेस्थानकावर कोरोनानिमित्ताने नियमित थांबत असलेल्या प्रवासी गाड्यांचा थांबा पूर्ववत करावा. या प्रश्नावर नांदगावचे नागरिक संवेदनशील आहेत. त्यामुळे याविषयी निर्मय झालाच पाहिजे अशी मागणी आमदार सुहास कांदे यांनी केली. 

नांदगाव : रेल्वेस्थानकावर कोरोनानिमित्ताने नियमित थांबत असलेल्या प्रवासी गाड्यांचा थांबा पूर्ववत करावा. या प्रश्नावर नांदगावचे नागरिक संवेदनशील आहेत. त्यामुळे याविषयी निर्मय झालाच पाहिजे अशी मागणी आमदार सुहास कांदे यांनी शुक्रवारी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक संजयकुमार मित्तल यांना केली. 

भुसावळ मंडळातील निरीक्षणासाठी ते आले असता मनमाड येथे मित्तल यांची आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वखालील नांदगावकर जनतेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. नांदगाव स्थानकाचे गाऱ्हाणे मांडून त्यांचे लक्ष वेधले. यावर नक्कीच योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन मित्तल यांनी दिले.
आमदार कांदे म्हणाले, नांदगावकरांनी या प्रश्नावर शहर बंदसारखे आंदोलन केल्याची माहिती आमदार कांदे यांनी श्री. मित्तल यांच्या लक्षात आणून दिली.

ते म्हणाले, गोरखपूर काशी एक्स्प्रेस, कामायनी एक्स्प्रेस, महानगरी एक्स्प्रेस, झेलम एक्स्प्रेस व जनता एक्स्प्रेस आदी रेल्वे गाड्यांचा थांबा रद्द करण्यात आल्या. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी या गाड्यांना पुन्हा नांदगाव रेल्वेस्थानकावर थांबा देण्यात यावा, तसेच मनमाड रेल्वेस्थानकावरून सुटणारी गोदावरी एक्स्प्रेस व मनमाड-इगतपुरी पॅसेंजर या गाड्या पुन्हा नियमित स्वरूपात सुरू कराव्यात, अशी मागणी आमदारांनी लेखी पत्राद्वारे केली. मनमाड स्थानकाबाहेरील टॅक्सी व रिक्षांचा थांबा रद्द केल्याने प्रवाशांना बरेच अंतर पायी चालून जावे लागत असल्याने प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन टॅक्सी व रिक्षांना पुन्हा रेल्वे स्थानकाजवळ थांबा देण्याबाबत चर्चा करून टॅक्सी व रिक्षा स्थानकाजवळ थांबण्यास परवानगी देण्यात आली आहे.

या वेळी मनमाड शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, जिल्हा संघटक राजाभाऊ भाबड, मुन्नाभाऊ दरगुडे, रवी खैरनार, सचिन दरगुडे, योगेश इमले आदी उपस्थित होते.
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख