माणिकराव कोकाटे समर्थकांकडून दहा कोटींचे नुकसान?

शहराच्या कडवा धरण पाणीपुरवठा योजनेतील जलशुद्धीकरण प्रकल्पाची जमीन खरेदी व योजनेच्या कंत्राटात ठेकेदाराशी संगनमत करून मागील सत्ताधाऱ्यांनी नगर परिषदेचे दहा कोटींचे नुकसान केल्याचा आरोप नगराध्यक्ष किरण डगळे यांनी केला.
Kokate- waje
Kokate- waje

सिन्नर : शहराच्या कडवा धरण पाणीपुरवठा योजनेतील जलशुद्धीकरण प्रकल्पाची जमीन खरेदी  व योजनेच्या कंत्राटात ठेकेदाराशी संगनमत करून मागील सत्ताधाऱ्यांनी जानगर परिषदेचे दहा कोटींचे नुकसान केल्याचा आरोप नगराध्यक्ष किरण डगळे यांनी केला. यापुर्वी नगरपरिषदेत आमदार माणिकराव कोकाटे गटाची सत्ता होती. त्यामुळे कोकाटे गटाच्या नगरसेवकांवर हा आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे. 

दरम्यान संबंधीतांनी ही नुकसानीच्या रक्कमेची भरपाई करुन द्यावी अथवा नगरपालिकेस ही रक्कम जबाबदार असणाऱ्यांनी भरावी, असा सांगत हे प्रकरण न्यायालयात नेणार असल्याचा इशाराही या वेळी दिला. नगर परिषदेत झालेल्या या पत्रकार परिषदेत गटनेते हेमंत वाजे, नगरसेवक पंकज मोरे, शैलेश नाईक, विजय जाधव, रूपेश मुठे, प्रतिभा नरोटे, सुजाता भगत, ज्योती वामने, उदय गोळेसर, संतोष शिंदे आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी कचरा डेपो जमीन खरेदीत सत्ताधारी गटाने गैरव्यवहार केल्याचा खोटा आरोप आमदार माणिकराव कोकाटे समर्थकांनी केला होता. आता माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या समर्थकांनी विरोधकांवर हा आरोप केल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. यासंदर्भात तत्कालीन नगराध्यक्षा अश्‍विनी देशमुख, तत्कालीन मुख्याधिकारी संजय जाधव यांच्यासह १७ जणांना वकिलामार्फत नोटिसा पाठविल्याचे डगळे यांनी सांगितले. 

कडवा योजनेसाठी २०१३ मध्ये कोनांबे शिवारात तीन हेक्टर ४० आर जागा आवश्यक होती. या जागेची शासकीय किंमत चार लाख ८९ हजार रुपये प्रतिहेक्टर प्रमाणे १६ लाख ६२ हजार इतकी होती. मात्र संबंधितांनी ही जमीन ५९ लाख ५० हजार इतक्या जादा रकमेला खरेदी करून नगर परिषदेच्या माथी मारली. यात सुमारे ४२ लाख ८८ हजारांचे नगर परिषदेला नुकसान झाल्याचे नगराध्यक्ष डगळे यांनी नमूद केले. 

योजनेची निविदा आर. ए. घुले या कंत्राटदाराला ८६ कोटी ५८ लाख ८९२ रुपयांना म्हणजेच २३.९ टक्के जादा दराने दिली. नगर परिषदेला कोणतीही निविदा दहा टक्क्यांपेक्षा जादा दराने मंजूर करता येत नाही. तरीही संबंधित त्या वेळी बैठकीला १७ जबाबदार नगरसेवकांनी मंजुरी दिली होती. त्यात नगर परिषदेचे सुमारे नऊ कोटी २७ लाख ८१ हजार ४६१ रुपयांचे नुकसान झाले आहे. हा सगळा पैसा सिन्नरकरांचा असून, त्याचा संगनमताने अपव्यय केल्याने तो वसूलपात्र असल्याचे डगळे यांनी सांगितले. 
ही रक्कम १५ दिवसांच्या आत नगर परिषदेस भरली नाही तर ती वसूल करण्यासाठी नाइलास्तव कायदेशीर कारवाई करावी लागणार असल्याचे नगरसेवक पंकज मोरे व शैलेश नाईक यांनी वकिलांमार्फत पाठविलेल्या नोटिशीत म्हटले आहे. 
...
सुमारे दहा कोटींची रक्कम १७ जणांना भरून द्यावी लागणार आहे. कुणालाही चुकणार नाही. कचरा डेपो जमीन खरेदी प्रकरणात विरोधकांनी आमची नाहक बदनामी केली. चुकीच्या निर्णयामुळे जनतेच्या पैशांचा अपव्यय झाला आहे. 
- हेमंत वाजे, गटनेते, सिन्नर नगर परिषद 
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com