Bhuse Hospital
Bhuse Hospital

कृषीमंत्र्यांच्या रुद्रावताराने अनधिकृत डॅाक्टर रडकुंडीला आला!

कोरोना रुग्णास तीन लाखांचे बील आकारून पुन्हा नातेवाईकांना धमकावले. यासंदर्भात नातेवाईकांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे दाद मागीतली. तेव्हा श्री. भुसे थेट रुग्णालयात गेले. चौकशी केली असता अनधिकृत डॅाक्टर उपचार करीत असल्याचे आढळल्याने रुग्णालयाचे पितळ उघडे पडले.

मालेगाव : कोरोना रुग्णास तीन लाखांचे बील आकारून पुन्हा नातेवाईकांना धमकावले. यासंदर्भात नातेवाईकांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे दाद मागीतली. तेव्हा श्री. भुसे थेट रुग्णालयात गेले. चौकशी केली असता अनधिकृत डॅाक्टर उपचार करीत असल्याचे आढळल्याने रुग्णालयाचे पितळ उघडे पडले. 

यासंदर्भात कारवाईचे आदेश देण्यात आले. यावेळी डॅाक्टरला अक्षरशः कापरे भरले होते. रडकुंडीला आलेला डॅाक्टर बिंग उघडकीस आल्याने गयावया करू लागला. यासंदर्भात माहिती अशी की, मालेगाव येथील सिक्स सिग्मा कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णालयावर चौदा दिवस उपचार करण्यात आले. त्यासाठी त्याने रुग्णालयाच्या मागणीनुसार ऐंशी हजार अनामत रक्कम दिली. औषध दुकानादाराला देखील सत्तर हजार रुपये अनामत दिले होते. दिड लाख रुपये अनामत दिल्यानंतर देखील रुग्णाला एक लाख ऐंशी रुपयांचे बील दिले होते. 

नातेवाईकांनी बील कमी करण्यासाठी वारंवार विनंती केल्यावर देखील डॅाक्टरांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे हे लोक थेट कृषीमंत्री दाद भुसे यांच्या कार्यालयात दाद मागण्यास गेले. त्यानंतर त्या बीलाची चौकशी केल्यावर श्री. भुसे देखील नाराज झाले. त्यांनी महापालिकेच्या ऑडीटर तसे पोलिसांना फोन केला. त्यांना रुग्णालयात येण्यास सांगितले. या ऑडीटमध्ये ब वर्ग शहरातील रुग्णालयाच्या तुलनेत जास्त आकारणी होती. जेवन न देताही दररोज तीनशे रुपये प्रती थाळी याप्रमाणे चौदा हजार रुपये आकारणी केली होती. आयसीयूचे दर साडे पाच हजार ऐवजी साडे सात हजार आकारणी केली होती. या बिलांत गोंधळ असल्याने रुग्णालयाचे प्रशासन चांगलेच अडचणीत आहे. 

मंत्री भुसे यांनी रुग्णालयाची माहिती घेतल्यावर त्यात डॅा सुराणा यांनी परवानगी घेतली होती. मात्र एक अनधिकृत डॅाक्टर या रुग्णालयाचे कामकाज पहात होते. त्याबाबत माहिती घेतल्यावर डॅाक्टर अक्षरशः गयावया करू लागला. त्याने माफी मागत हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र मंत्री भुसे यांनी रुग्णालयाची तपासणी करून नियमबाह्य कामकाज असल्यास कायदेशीर कारवाई करण्याची सूचना केली. त्यात या रुग्णाच्या नातेवाईकांच्या बील देखील दिड लाखांनी कमी झाली. याबाबतचा व्हीडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला. 
...  
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com