नाशिकमध्ये वैद्यकीय पर्यटन हब निर्माण करणार

नाशिकचे उत्तम हवामान व सुसंस्कृत राहणीमान ही ओळख टिकवून नाशिकमध्ये वैद्यकीय पर्यटनाचे हब निर्माण करण्याचा मानस आहे. तसेच आज सर्वांनी जात, धर्म, प्रांत, लिंगभेद विसरुन कोरोनासारख्या विषाणूचा एकजुटीच्या भावनेने सामना करावा.
15 Aug2021
15 Aug2021

नाशिक : नाशिकचे उत्तम हवामान व सुसंस्कृत राहणीमान ही ओळख टिकवून (Pleasent envirnment & Culture leaving)  नाशिकमध्ये वैद्यकीय पर्यटनाचे हब निर्माण (That will helpfull to devolop medical tourism hub in nashik) करण्याचा मानस आहे. तसेच आज सर्वांनी जात, धर्म, प्रांत, लिंगभेद विसरुन कोरोनासारख्या विषाणूचा एकजुटीच्या भावनेने सामना करण्याचे आवाहन, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी केले आहे.

विभागीय आयुक्त कार्यालय येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते संपन्न झाले, त्यावेळी  पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. ते म्हणाले की, क्रांतीकारक, स्वातंत्रसैनिकांनी जसे देशाला ब्रिटीशांच्या तावडीतून मुक्त करुन स्वरुन स्वातंत्र्य मिळवून देण्याचा चंग बांधला होता. त्याप्रमाणे आज स्वातंत्र्यदिनी सर्वांना एकजूट व ऐक्यातून देशाला राज्याला, जिल्ह्याला कोरोनामुक्त संकल्प करण्याचे आवाहन पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी सर्व नागरिकांना केले आहे. नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व पदव्यूत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था देशात रोल मॉडेल ठरेल अशा पध्दतीने विकसित करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी सांगितले.

सर्व यंत्रणेच्या अहोरात्र मेहनतीने जिल्ह्यातील कोरोनारुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. कोरानाकाळात आपली आरोग्य व्यवस्था बळकटीकरणावर भर देवून नवीन ऑपरेशन थिएटर्स, ऑक्सिजन प्लांट, सर्व सुविधांनी युक्त प्रयोगशाळा कमी कालावधीत पुर्ण करण्यात येत आहे. तसेच 

म्युकरमायकोसिस सारख्या आजाराला प्रशासन व आरोग्य विभागाने प्रभावीपणे नियंत्रणात  आणले असल्याचे सांगत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी समाधान व्यक्त केले. कोरानासारख्या संकटकाळात कुणाचीही उपासमार होवू नये यासाठी अन्न्, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यात 1 हजार 167 शिवभोजन केंद्रामार्फत 5 कोटी थाळी वाटपाचा टप्पा पार केला आहे. त्याचबरोबर 15 एप्रिल 2021 पासून गरीब व गरजू जनतेला शिवभोजन थाळी नि:शुल्क उपलब्ध करुन दिली जात असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

नाशिक विभागातील आत्महत्याग्रस्त पात्र शेतकरी कुटुंबियांच्या वारसांना सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून उभारी योजनेच्या माध्यमातून मदत करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्षामार्फत 1 हजार 341 अर्जांचे निराकरण करण्यात आले आहे. डिजिटल इंडिया आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात अभिलेखांच्या स्कॅनिंग प्रकल्पाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले असल्याचे पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी सांगितले.

याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार सरोज अहिरे, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या संचालिका अश्वती दोरजे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस अधिक्षक सचिन पाटील, माजी मंत्री शोभा बच्छाव उपस्थित होते.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com