मालेगाव आयुक्तांविरोधातील अविश्वास आज मंजूर होणार ?

महानगरपालिका आयुक्त ञ्यंबक कासार यांच्याविरुध्दचा अविश्‍वास ठराव आज होणाऱ्या विशेष महासभेत चर्चेला येणार आहे. महापालिका स्थापन झाल्यापासूनचा हा पहिलाच अविश्वास ठराव आहे.
malegaon Rashida
malegaon Rashida

मालेगाव : महानगरपालिका आयुक्त ञ्यंबक कासार यांच्याविरुध्दचा अविश्‍वास ठराव आज होणाऱ्या विशेष महासभेत चर्चेला येणार आहे.  महापालिका स्थापन झाल्यापासूनचा हा पहिलाच अविश्वास ठराव आहे. रखडलेला विकास आणि विविध तक्रारींमुळे अविश्‍वास ठरावाच्या मुद्यावरून शहरातील राजकारण तापले आहे. मात्र सत्तारूढ व विरोधक सगळ्यांचेच एकमत असल्याने या ठरावाची मंजूरी ही केवळ औपचारीकताच आहे.  

दरम्यान अविश्वास ठराव बहुमताने मंजूर होईल, असा विश्‍वास माजी महापौर रशीद शेख यांनी व्यक्त केला. शहरहितासाठी आयुक्तांविरोधात अविश्‍वास ठराव आणला. नगरसेवक जनमताचा आदर करतील. जे सदस्य या ठरावाला विरोध करतील, ते शहरविरोधी असल्याचे सिद्ध होईल, असे श्री. शेख यांनी सांगितले. या प्रश्‍नी श्री. शेख, विरोधी महागटबंधन आघाडीच्या गटनेत्या शानेहिंद निहाल अहमद व एमआयएमचे गटनेते डॉ. खालीद परवेज यांच्या पत्रकार परिषद झाल्या.

सत्तारूढ गटाला जनता दल व महागटबंधन आघाडीतील काही सदस्य सहकार्य करणार असल्याचे शानेहिंद यांनी सांगितले. याउलट एमआयएमचे गटनेते डॉ. खालीद परवेज व त्यांचे समर्थक असलेले महागटबंधन आघाडीतील काही सदस्य तटस्थ राहण्याची शक्यता आहे. मनपाच्या ५४ सदस्यांनी अविश्‍वास प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे. त्यांच्यासह महागटबंधन आघाडीतील सदस्यांच्या पाठिंब्यामुळे ठराव विक्रमी बहुमताने मंजूर होईल. या प्रश्‍नी महागटबंधन आघाडीत दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. २५ मार्चला दुपारी चारला महासभागृहात यासाठी ऑनलाइन विशेष महासभा होईल.
...
आयुक्त त्र्यंबक कासार यांच्या कामकाजाबाबत प्रारंभापासूनच तक्रारी होत्या. यासंदर्भात महापौर ताहेरा शेख यांच्यासह आपण स्वत: प्रधान नगरसचिवांकडे मुद्देनिहाय तक्रारी केल्या होत्या. आयुक्तांच्या कार्यपद्धतीत कुठलीही सुधारणा न झाल्याने अविश्‍वास ठराव आणला तो मंजूर होईल.

- रशीद शेख, माजी महापौर, कॉंग्रेस नेते
...
आयुक्तांनी केलेला गैरव्यवहार सत्तारूढ गटाच्या संगनमतानेच केला. दोन भ्रष्टाचारी एकत्र येऊन जास्त उत्पाद करतील. एकाला हटविण्याची संधी आल्याने ती वाया का घालवायची? 
- शानेहिंद निहाल अहमद, महागटबंधन आघाडी गटनेत्या.
...
जनता दल आयुक्तांच्या गैरकारभाराविरोधात सातत्याने आवाज उठवत आले आहे. आयुक्तांची पाठराखण करणाऱ्यांनी त्यांनी केलेले एकतरी चांगले काम सांगावे. अविश्‍वास ठरावाला आमचा पाठिंबा आहे.

- मुश्‍तकिम डिग्निटी, नगरसेवक, जनता दल नेते
...
सत्तारूढ कॉंग्रेस, शिवसेनेने आयुक्तांविरुध्द आणलेला अविश्‍वास ठराव जनतेसाठी दिखावा आहे. सत्तारूढ गट व प्रशासन यांच्या संगनमताने गैरकारभार झाला. मनपाची आर्थिक नाकेबंदी झाली. दरमहा एक घोटाळा होत आहे.

- डॉ. खालीद परवेज, मनपा गटनेते, एमआयएम.
...


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com