नाशिक महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यात शविसेना, राष्ट्रवादी कॅाग्रेस आणि कॅाग्रेस हे तिन्ही पक्ष कारभार करीत आहेत. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रीतपणे लढण्याचे जाहीर केले आहे.
Bhujbal- Raut
Bhujbal- Raut

नाशिक : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यात शविसेना, राष्ट्रवादी कॅाग्रेस आणि  कॅाग्रेस हे तिन्ही पक्ष कारभार करीत आहेत. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रीतपणे लढण्याचे जाहीर केले आहे. मात्र नाशिकला प्रारंभी शिवसेनेने व त्या पाठोपाठ राष्ट्रवादी कॅांग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची नाशिकला मात्र बिघाडी होणार असे संकेत मिळत आहेत.  

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस अशी महाविकास आघाडीची सत्ता असली तरी आगामी महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर शिवसेनेचाही `एकला चलो रे`चा नारा घुमु लागला आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेना महानगरप्रमुखपदी सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती झाल्याबद्दल नाशिक रोड शिवसेना विभागाच्यावतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये विकास आघाडीने एकत्र निवडणुका लढवून दोन जागा वगळून आपली ताकत दाखवली होती. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल असा संदेश शिवसैनिकांमध्ये पोचवला. 

शिवसेनेच्या या घोषणेनंतर त्यापाठोपाठ राष्ट्रवादी कॅांग्रेसनेही आगामी महापौर राष्ट्रवादीचा असावा असे वाटते अशी प्रतिक्रीया पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली होती. आता या पक्षाने एक सदस्यीय प्रभागरचना करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे या दोन्ही प्रमुख पक्षांनी महापालिका निवडणुकीची जोमाकत तयारी सुरु केल्याचे संकेत दिले आहेत. त्यात नेहेमीप्रमाणे कॅांग्रेस पक्षात फारशा हालचाली नाहीत. त्यामुळे राज्यात सरकारमध्ये तिन्ही पक्ष एकत्र असले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत ही आघाडी एकत्र सामोरे जाईल असे नेत्यांनी जाहीर केले होते. तरीही महापालिका निवडणुकीत महत्वाकांक्षेमुळे हे पक्ष एकत्र राहतील याची शाश्वती दिसत नाही. तशी राजकीय चिन्हे नाहीत. त्यामुळे नाशिकला महाविकास आघाडीत बिघाडी अटळ आहे.  

नवनियुक्त शिवसेना महानगरप्रमुख श्री. बडगुजर यांनीही एकला चालो रे चा नारा दिल्याने चर्चेचा विषय आहे. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये नाशिक रोड विभागात सर्वाचे् सर्व् नगरसेवक हे शिवसेनेचे असतील यासाठी आम्ही सर्वजण जोमाने काम करू. शिवसेनेचे सामाजिक काम जनतेपर्यंत पोहोचवू असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी महानगरप्रमुख बडगुजर यांना दिला. शहरामध्ये केलेली विविध विकासाची कामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम शिवसेना शाखाप्रमुखांपासून तर सर्व पदाधिकाऱ्यांचा आहे असं मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. 

पक्षनिष्ठांचा विचार करा
यावेळी कार्यकर्त्यांनी नेत्यांचे लक्ष समस्यांकडे वेधले. कार्यकर्ते नेहेनीच पक्षासाठी सक्रीय असतो. तो पाच वर्षे अपेक्षेने काम करतो. परंतु निवडणुका आल्या की, दुसऱ्या कोणाला तरी उमेदवारी दिली जाते. जो प्रामाणिकपणे काम करतो त्याच्यावर अन्याय होतो. त्यामुळे उमेदवारीचा विचार करताना पक्षनिष्ठांचा विचार करावा. गेल्या निवडणुकीत पक्षाने  उमेदवारी देऊनही कार्यकर्तानी काम केले नाही. त्यामुळे भाजपाची सत्ता आली. यापुढे असे होवू नये याबाबात काळजी घ्या असे कार्यकर्त्यांनी सांगितले. 
..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com