खासदार भारती पवारांच्या घरी बिबटयाचे अवचित दर्शन! 

नागरिकांच्या अडचणी सोडवत बसलेल्या खासदार डॉ. भारती पवार यांच्या घराच्या आवारतच बिबट्याने दर्शन दिले. कदाचीत तो देखील आपल्या समस्या व्यक्त तर करायला आला असावा की काय? अशी चर्चा पसरली. अर्थात तो अबोल आला अन्‌ गर्दी पाहून धावतच दुसरीकडे गेला.
Bibtya
Bibtya

नाशिक : नैसर्गिक लपण आणि संकटात आलेला हक्काचा जंगलातील आधिवास संपुष्टात येत असल्याने हल्ली बिबट्याचे अवचित दर्शन कुठेही होऊ लागले आहे. मात्र आज रविवारच्या निवांत क्षणी नागरिकांच्या अडचणी सोडवत बसलेल्या खासदार डॉ. भारती पवार यांच्या घराच्या आवारतच बिबट्याने दर्शन दिले. कदाचीत तो देखील आपल्या समस्या व्यक्त तर करायला आला असावा की काय? अशी चर्चा पसरली. अर्थात तो अबोल आला अन्‌ गर्दी पाहून धावतच दुसरीकडे गेला. आता वन विभागाचे कर्मचारी त्याचा शोभ घेत आहे. यावेळी खासदार पवार यांच्या निवासस्थानी असलेल्यांनी त्याचा व्हीडीओ देखील काढला. 

खासदार भारती पवार राहतात त्या भागात यापूर्वी देखील वर्दळीच्या भागात बिबट्याचे आगमन झाले होते. दोन वर्षांपूर्वी झालेल्या त्या घटनेत बिबट्याच्या हल्ल्यात विविध नागरिक देखील जखमी झाले होते. मात्र आज सकाळी तो चक्क खासदारांच्याच बंगल्याच्या आवारात प्रकटला. हा भाग अतिशय दाट लोकवस्तीचा आहे. शेजारी शंभर मीटरवर गोदावरी नदी वाहते आहे. त्यानंतर मखमलाबादचा काही शेती, द्राक्षबागा व फार्म हाऊस असलेला भाग आहे. त्यामुळे त्या भागातून बिबट्या वाट चुकल्याने गोदावरीच्या उत्तरेला आला असावा. बिबट्याचा वावर समजताच या भागातील नागरिकांत भितीचे वातावरण होते. कोरोनाचे लॉकडाउन असल्याने या भागात नागिरकांची फराशी गर्दी नव्हती. सकाळची वेळ असल्याने व सर्व दुकाने बंद असल्याने निर्मनुष्य असलेल्या या भागातील रस्त्यावर बिबट्या आपल्यासाठी वाट शोधत असल्याचे नजरेस पडले. 

यासंदर्भात खासदार डॉ भारती पवार यांनी स्वतःच बिबट्या आल्याचे पाहिल्यावर त्याचा व्हीडीओ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र चणाक्ष व अतिशय चपळ बिबट्या व्हीडीओत कैद झाला, मात्र त्याचे वेग अतिशय जास्त असल्याने तो लगेचच परिसरातील इतर इमारतींकडे रवाना झाला. पोलिस तसेच वन विभागाचे कर्मचारी त्याचा शोध घेत आहेत. 

सकाळी अडचणी घेऊन आलेल्या नागरिकांशी त्यांच्या प्रश्‍नांवर चर्चा करीत असतानाच बिबट्या बंगल्याच्या आवारात दिसला. लोकांनी त्याला पाहिल्यावर थोडीशी धावपळ झाली. मग मलाही तो दिसला. आमच्या घराच्या आवारात आल्यावर गर्दी पाहून तो भिंटीवरून उडी मारून तो शेजारच्या आवारात गायब झाला. आता त्याचा शोध घेतला जात आहे. लवकरच तो सापडेल. त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याची व्यवस्था करण्यात येईल. - खासदार डॉ भारती पवार. 
...  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com