पालकमंत्री के. सी. पाडवी म्हणतात, आता बेशिस्तांवर कारवाईची वेळ

ग्रामीण भागात वाढणारा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत. कोरोनाची समस्या गंभीर झाली आहे. सर्व नागरिकांनाही त्याचे महत्व समजले पाहिजे. त्यात बैशिस्तपणा करतील त्यांच्यावर कडक करवाई करण्याची वेळ आली आहे.
K C Padvi
K C Padvi

नंदुरबार : ग्रामीण भागात वाढणारा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत. कोरोनाची समस्या गंभीर झाली आहे. सर्व नागरिकांनाही त्याचे महत्व समजले पाहिजे. त्यात बैशिस्तपणा करतील त्यांच्यावर कडक करवाई करण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या नियंत्रणासाठी ते करावेच लागेल. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर यापुढे प्रशासनाने कारवाई करावी, असे निर्देश आदिवासी विकासमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी दिले. 

दूरदृश्‍य प्रणालीद्वारे झालेल्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. नितीन बोडके आदी उपस्थित होते. 

ॲड. पाडवी म्हणाले, की ग्रामीण भागात लसीकरण मोहीम राबविण्यासोबत संपर्क साखळी खंडित करण्यासाठी वेळीच प्रयत्न करावेत. या संकटाच्या काळात सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. गरजेनुसार व्यवस्थेत बदल करून रुग्णांसाठी चांगल्या सेवा देण्याचा प्रयत्न करावा. सर्व यंत्रणांनी समन्वयाने संपर्क साखळी तोडण्यासाठी नियोजन करावे. रुग्णांवर उपचारासाठी कोविड केअर सेंटरची क्षमता वाढवावी. प्रकृती अत्यंत खालावल्यानंतर रुग्णाला उपचारासाठी आणण्याऐवजी नागरिकांनी वेळीच उपचार घ्यावेत याबाबत जागृती करावी. परजिल्ह्यात किंवा राज्यात रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात पाठविल्याने संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेता, असे घडू नये यासाठी त्या-त्या जिल्ह्यातील प्रशासनाशी चर्चा करावी. लग्नसोहळे घरगुती स्वरूपात करण्याबाबत किंवा काही कालावधीनंतर घेण्याबाबत नागरिकांना आवाहन करावे. होम क्वारंटाइन रुग्ण बाहेर फिरणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. 

खासगी कोविड रुग्णालयांना रेमडेसिव्हिरची कमतरता भासत असल्याने जिल्ह्यात इंजेक्शनचा पुरवठा वाढविण्यासाठी मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांशी चर्चा करू. जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. ऑक्सिजन पुरवठ्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करावी, त्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल. अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांबाबत मुख्य सचिवांशी चर्चा करण्यात येईल, असे पालकमंत्री म्हणाले. शहरात होणारी गर्दी कमी करण्यासाठी लॉकडाउन काळात सुरू असलेली आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसलेली दुकाने सील करावीत. अत्यावश्यक सेवेत नसलेल्या वाहनांना इंधन देणाऱ्या पेट्रोलपंपावर कारवाई करावी. अशा कारवाईत कुचराई झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. भाजी बाजारात सोशल डिस्टन्सिंगचे कठोरतेने पालन होईल याकडे लक्ष द्यावे. भाजीपाला विक्री करणाऱ्यांना विभागनिहाय बसण्याची व्यवस्था करावी. त्यासाठी ठराविक अंतराने खुणा कराव्यात. बाजारात गर्दी होणार नाही यासाठी पथकामार्फत दक्षता घ्यावी. शासनाने दिलेली मुभा नागरिकांच्या सोयीसाठी आहे. मात्र मार्गदर्शक सूचनांचे पालनही महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. 

शहादा येथे ऑक्सिजन प्लांटसह १०० बेड 
जिल्हाधिकारी डॉ. भारूड यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीची माहिती या वेळी दिली. जिल्ह्यात नव्याने ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शासकीय रुग्णालयांसाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध असून, खासगी रुग्णालयांसाठी पुरवठा वाढविण्याची गरज आहे. शहादा ऑक्सिजन प्लांट या आठवड्यात पूर्ण होईल. शहादा येथे १०० ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था करण्यात येत असून, खासगी चार डॉक्टरांची सेवा घेण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. या वेळी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्याधिकारी, पालिकेचे मुख्याधिकारी, पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com