जयंत पाटील, फडणवीस आले... आता तरी रस्त्याचे भाग्य उजळेल का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले. त्यांनी ज्या रस्त्याने एकत्रीत प्रवास केला, त्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. त्यामुळे या दौऱ्याने तीर या रस्त्याचे भाग्य उजळेल का? असा प्रश्न नागरिक विचारीत होते.
Jayant Patil-Phadanvis
Jayant Patil-Phadanvis

शहादा : लोणखेडा (ता. शहादा) (Shahada) येथील पाटीदार मंगल कार्यालयात सहकार महर्षी अण्णासाहेब पी. के. पाटील (P. K. Anna patil)यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, (Jayant Patil) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Phadanvis) उपस्थित राहिले. त्यांनी ज्या रस्त्याने एकत्रीत प्रवास केला, (Travel together) त्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. त्यामुळे या दौऱ्याने तीर या रस्त्याचे भाग्य उजळेल का? (Will road Repair) असा प्रश्न नागरिक विचारीत होते. 

शहदा परिसरातील प्रमुख राज्य मार्गावरील रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांचा अनुभव शनिवारी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेत्यांनी स्वतः सोनगीर ते शहादा व शहादा ते शिरपूर प्रवासादरम्यान घेतला. रस्त्यांची काय वाताहत झाली आहे हे प्रत्यक्ष दिग्गजांनी अनुभवल्यामुळे आता तरी निदान रस्त्याचे भाग्य उजळेल, अशी अपेक्षा नागरिकांना आहे.

लोणखेडा (ता. शहादा) येथील पाटीदार मंगल कार्यालयात सहकार महर्षी अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या पूजनानंतर झालेल्या आदरांजली सभेच्या अध्यक्षस्थानी जयंत पाटील होते. यावेळी ते म्हणाले, शेतकरी जगला पाहिजे यासाठी पीके आण्णांनी उपसा सिंचन योजनांचा सपाटा लावला होता. एवढ्या झपाट्याने काम करणारा नेता महाराष्ट्रात अभावाने घडतो. स्वाभिमानाने कसे जगावे हा आदर्श अण्णांनी निर्माण केल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.
ते पुढे म्हणाले, स्वर्गवासी अण्णासाहेब पी. के. पाटलांनी परिसरात अनेक सहकारी संस्था उभ्या केल्या. अनेकांना रोजगार दिला. सहकार चळवळीची कोणतीही नवी भूमिका शहाद्यातून असायची. अण्णासाहेबांनी कोणतीही गोष्ट हातात घेतली की ती पूर्णत्वास आणायची हा त्यांचा स्वभाव होता. 

विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले, पी. के. अण्णा पाटील समाजसुधारक होते. त्यांनी पुरोगामी आचार समाजामध्ये बिंबवला. त्यांच्या स्मारकातून प्रेरणा मिळेल. गुलाबराव पाटील यांनी अण्णासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी केलेल्या कार्याची जाणीव उपस्थितांना करून दिली. 

यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री अॅड. के. सी. पाडवी, आमदार अमरिशभाई पटेल, आमदार जयकुमार रावल, खासदार रक्षा खडसे, आमदार राजेश पाडवी, आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार काशिराम पावरा, आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, शिरीष चौधरी, कमल पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, बबन चौधरी, रवी अनासपुरे, भरत माळी, पी. के. अण्णा पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाला विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. विजय प्रकाश शर्मा यांनी सूत्रसंचालन केले.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com