एकसंघ हिंदू धर्मासाठी सामाजिक समरसता हवीच - Hindu Dharm for Equality Devendra Fadanvis Political news | Politics Marathi News - Sarkarnama

एकसंघ हिंदू धर्मासाठी सामाजिक समरसता हवीच

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 13 जानेवारी 2021

देशात सामाजिक समरसता निर्माण झाल्या शिवाय खया अर्थाने एकसंघ हिंदू धर्म निर्माण होणार नाही. हि बाब अधोरेखित झाल्याने सामाजिक समरसतेला कृतीची जोड देण्याचे काम नाना नवले यांनी केले असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नाशिक : देशात सामाजिक समरसता निर्माण झाल्या शिवाय खया अर्थाने एकसंघ हिंदू धर्म निर्माण होणार नाही. हि बाब अधोरेखित झाल्याने सामाजिक समरसतेला कृतीची जोड देण्याचे काम नाना नवले यांनी केले असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ते म्हणाले, आयुष्यभर लोक जोडतं गेल्याने त्यातून छोटा-मोठा, गरीब-श्रीमंत भेदाभेद नष्ट झाला. औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची भुमिका राष्‍ट्रीय स्वंयसेवक संघाची होती. परंतू त्यावेळी अपप्रचार करण्यात आला. नानांनी संघाची भुमिका लोकासंमोर मांडण्याचे काम केले.

गंगापूर रोडवरील शंकराचार्य न्यासाच्या सभागृहात नाना नवले यांच्या जीवन कार्यावर आधारीत ‘नाना नवल' पुस्तकाचे प्रकाशन श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलतं होते. यावेळी व्यासपिठावर माजी मंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. भारती पवार, जेष्ठ साहित्यिक रमेश पतंगे, कैलास साळुंखे, जेष्ठ नेते सुरेश बाबा पाटील आदी उपस्थित होते. यावेळी अधिक बोलताना श्री. फडणवीस म्हणाले, एखाद्या स्थितप्रज्ञासारखे काम करताना नानांनी व्यक्ती निर्माणाचे कार्य केले.

ते म्हणाले, नानांच्या संपर्कातून अनेकांना परिस्पर्श झाला. व्यक्तीची पारख करणारे नानांचे व्यक्तिमत्व राहिले. आयुष्यभर इतरांना काही ना काही देण्याचे काम करताना सामाजिक समरसतेचा भाव निर्माण करण्याचे मोठे काम त्यांच्या हातून घडले आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरणासाठी भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन, गोपिनाथ मुंडे यांनी कारावास भोगला. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्याची संघाची भुमिका होती. मात्र त्यावेळी संघाविषयी अपप्रचार केला गेला. संघची भुमिका नानांनी लोकांसमोर जावून मांडली. इंदिरा गांधी सरकार मध्ये अनेकांना तुरूंगवास भोगावा लागला. मात्र संघ विचाराने प्रेरित कार्यकर्ते खचले नाहीत. कार्यकर्त्यांना उभे करण्याचे काम नानांनी केल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

संघ साहित्यात योगदान
संघ साहित्यात वैचारीक क्रांती घडविणारे मी, मनु आणी संघ या पुस्तकाचे श्रेय नाना नवले यांनाचं जाते. नानांनी विचारातून कृती करण्याचे काम केले. सामाजिक समरसता निर्माण करण्याचे त्यांचे कार्य महान आहे. वीस वर्षांपुर्वीच्या व आजच्या सामाजिक चर्चेच्या विषयांमध्ये मोठा फरक आहे. आजच्या विषयांमध्ये सामाजिक समरसता अधिक दिसते त्याचे श्रेय नाना यानांच जात असल्याचे जेष्ठ साहित्यिक रमेश पतंगे यांनी सांगितले.
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख