नाशिकला कोरोनाच्या नियंत्रणासाठी आरोग्यमंत्र्यांची त्रिसूत्री 

कोरोना संसर्ग फैलाव नियंत्रणासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर इंजेक्शन, व्हेंटिलेटरचा कार्यक्षम वापर करण्याचा त्रिसूत्री ‘फॉर्म्युला’ दिला. धुळे आणि मालेगावमधील भेटीनंतर नाशिकमध्ये दाखल झाल्यावर मोजक्या अधिकाऱ्यांकडून कोरोनाविषयक उपाययोजनांचा आढावा सरकारी विश्रामगृहात घेतला.
Rajesh Tope
Rajesh Tope

नाशिक : कोरोना संसर्ग फैलाव नियंत्रणासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर इंजेक्शन, व्हेंटिलेटरचा कार्यक्षम वापर करण्याचा त्रिसूत्री ‘फॉर्म्युला’ दिला. धुळे आणि मालेगावमधील भेटीनंतर नाशिकमध्ये दाखल झाल्यावर मोजक्या अधिकाऱ्यांकडून कोरोनाविषयक उपाययोजनांचा आढावा सरकारी विश्रामगृहात घेतला. 

उत्तर महाराष्ट्रातील भेटीमध्ये रुग्णालयांमध्ये खाटा ‘फुल’ झाल्यात म्हटल्यावर रुग्णांना कुठं ठेवणार? असा पहिला प्रश्‍न श्री. टोपे यांनी अधिकाऱ्यांपुढे ठेवला. तसेच खासगी रुग्णालयासाठी लागणाऱ्या नेमक्या ऑक्सिजनचे मापन होतेय काय? अशी विचारणा त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली. खासगी रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर, अतिदक्षता विभागात अधिकचा ऑक्सिजन लागतो. त्या मुळे रुग्णालयनिहाय नेमका किती ऑक्सिजन दिवसाला आवश्‍यक आहे, याची स्थिती स्पष्ट झाल्यावर गरजेचेपेक्षा अधिक ऑक्सिजनचा साठा रुग्णालयात करून ठेवायला हवा. त्याचवेळी कोरोना व्यतिरिक्त रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनचा विचार मापनामध्ये व्हायला हवा. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांसाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शन योग्य प्रमाणात उपलब्ध करून द्यायला हवेत. मालेगावमध्ये व्हेंटिलेटरचा उपयोग चांगला होत असल्याचे पाहिले असून, आता मोकळे असलेले व्हेंटिलेटर वापरण्यासाठीचे नियोजन केले जावे. शिवाय गरज नसल्यास मोकळे व्हेंटिलेटर इतर ठिकाणी वापरण्याचे नियोजन करावे, असेही श्री. टोपे यांनी स्पष्ट केले आहे. 

ऑक्सिजन ‘गॅप’ची शंका 
खासगी रुग्णालयनिहाय नेमक्या किती ऑक्सिजनची दिवसाला आवश्‍यकता आहे आणि त्याप्रमाणात अधिकचा ऑक्सिजन उपलब्ध करून दिला जातोय, याची माहिती आरोग्य यंत्रणेकडे नसल्याचे स्पष्ट झाले. त्या मुळे एकीकडे रुग्णालयांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा करूनही अतिरिक्त ऑक्सिजन शिल्लक राहत असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात येत असले, तरीही ‘गॅप’ची शंका तयार झाली आहे. रुग्णांच्या नातेवाइकांकडून रुग्णालयामध्ये खाटेची विचारणा झाल्यावर ऑक्सिजन नसल्याचे पुढे केले जात असल्याचे कारण त्यामागे आहे, असे दिसते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com