आरोग्यमंत्री राजेश टोपे मध्यरात्री रुग्णालयात येतात तेव्हा...

शहरासह, राज्यातील कोरोना संसर्गावर निश्र्चित मात करू..प्राणवायू व रेमेडिसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा तातडीने दुर केला जाईल. या अडचणींवर मात करण्यासाठी राज्यातील अन्य रूग्णालयांसारखे येथील सामान्य रुग्णालयात वीस हजार लिटरचा प्राणवायूचा टॅंक तातडीने करण्याचे निरिदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.
Rajesh Tope
Rajesh Tope

मालेगाव : शहरासह, राज्यातील कोरोना संसर्गावर निश्र्चित मात करू..प्राणवायू व रेमेडिसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा तातडीने दुर केला जाईल. या अडचणींवर मात करण्यासाठी राज्यातील अन्य रूग्णालयांसारखे येथील सामान्य रुग्णालयात वीस हजार लिटरचा प्राणवायूचा टॅंक तातडीने करण्याचे निरिदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. 

काल सायंकाळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी धुळे येथे कोरोनाचा आढावा घेतला. यावेळी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी विविध सूचना केल्या. त्यानंतर ते मुंबईकडे परत असतनांना मद्यराक्षी त्यांनी अचानक मालेगावच्या जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट दिली. अचानक झालेल्या या भेटीने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. 

यावेळी आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद ईस्माईल त्यांच्या समवेत होते. श्री.टोपे यांनी सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय सेवेबाबत समाधान व्यक्त केले. त्याचवेळी महापालिकेने पूर्ण तयारी झाली असताना दिलावर सभागृह व हज हाऊस येथील कोविड सेंटर  केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. खासगी रुग्णालयात प्राणवायूच्या सिलींडरचा तुटवडा आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांना त्यांनी खासगी रुग्णालयात प्राणवायू सिलींडर उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांनी रुग्णांशी देखील संवाद साधला. महापालिका प्रशासनाने दोन नवीन कोविड उपचार केंद्र तातडीने सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले. यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्मचारी भरतीसाठी सुचना केली. नागरिकांत लक्षणं दिसल्यास ताबडतोब चाचणी करून घ्यावी. मास्कचा वापर, सोशल डिस्यन्सिंग याविषया नागरिकांत प्रबोधन करावे यांसह औषधांची उपलब्धता असावी यावर लक्ष देण्यासाठी यंत्रणा करण्यास सांगितले. यावेळी आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद ईस्माईल यांनी मनपा प्रशासनाने कुठलेही नियोजन केले नाही असा आरोप करतानाच, प्रशासनावर त्यांनी कठोर शब्दात टिका केली.

...
लसीकरण मोहीम हाती घ्या.
पूर्व भागात लसीकरण मोहीम राबविण्यासाठी जोमाने काम करा. लोकप्रतिनिधी व नगरसेवकांनी यासाठी सहकार्य करावे. लसीकरण केंद्र वाढवावे. मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. शहरावर आपलं व्यक्तीगत लक्ष असल्याने येथील समस्या प्राधान्याने सोडवू. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com