उच्च न्यायालयाचे निर्देश; महापालिकेने कायद्याच्या चौकटीत काम करावे   

कोरोना महामारीच्या काळात महापालिकेला माहिती मागविण्याचा अधिकार आहे. असे असले तरीही बेकायदेशीर पद्धतीने काम करण्याचा अधिकार नाही, यापुढे कायद्याच्या चौकटीतच काम करावे असावे, असे उच्च न्यायालयानेमहापालिकेला बजावले आहे.
NMC
NMC

नाशिक : कोरोना महामारीच्या काळात महापालिकेला माहिती मागविण्याचा अधिकार आहे. (NMC Had right to ask information in covid19 situation) असे असले तरीही बेकायदेशीर पद्धतीने काम करण्याचा अधिकार नाही, (But act should not be in illiegal way) यापुढे कायद्याच्या चौकटीतच काम करावे असावे, (They should work in legal frame) असे उच्च न्यायालयाने (Mumbai High court) महापालिकेला बजावले आहे. 

नाशिकमधील रुग्णालयांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कुठलेही ठोस कारण न देता, तीन दिवसांत कागदपत्र सादर करा अशी बेकायदेशीर नोटीस बजावल्याच्या विरोधात रुग्णालयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पहिल्या सुनावणीत तीन दिवसांची मुदत वाढवून १५ दिवसांची करून रुग्णालयांना दिलासा दिला होता. 

यासंदर्भात कागदपत्र सादर केल्याने खटला संपला असला तरीही, महापालिकेच्या कारभराविषयी न्यायालयाने नाराजी व्यक्त करून इथून पुढे कुठलेही काम कायदेशीर मार्गानेच असावे, असे म्हटले आहे. 

गेल्या महिन्यात महापालिकेने कोणतेही कारण न देता, ५१ हॉस्पिटल्सला नोटीस बजावून मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात दाखल झालेल्या सर्व कोविड रुग्णांची बिले व इतर कागदपत्र ३ दिवसांत सादर करण्यास सांगितले होते. पालिकेला वेळोवेळी सर्व माहिती आणि बिले सादर करूनही पुन्हा त्याची मागणी का केली आहे, असा प्रश्न निर्माण झाला. काही रुग्णालयांनी पत्राद्वारे याबाबत विचारणा केली. बेड आणि रुग्णसंख्या फेर पडताळणीसाठी माहिती मागवली आहे, असे सांगत पुन्हा ३ दिवसांची मुदत देऊन अंतिम नोटीस बजावली होती. प्रशासनाची ही भूमिका बेकायदेशीर व अन्यायकारक असल्याने ८ रुग्णालयांनी उच्च न्यायालयात महापालिकेच्या या नोटीशीला आव्हान दिले होते. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन या खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅक झाली. 

उच्च न्यायालयाने मनपाच्या कायदेशीर कारभारावर शंका व्यक्त केली आहे. म्हणून, यापुढे नियमानुसार काम करावे, अशा सूचना दिल्या तसेच, रुग्णालयांनी कागदपत्र सादर केले असल्याने मनपाने दिलेल्या नोटीशीच्या कारवाईला पूर्णविराम मिळाला आहे. हॉस्पिटल्सच्या वतीने अॅड तुषार सोनवणे यांनी युक्तिवाद केला. 

या नोटीस विरोधात ठामपणे विरोधात उभे राहून शहरातील ८ रुग्णालयांनी महापालिकेचा गलथान व अन्यायकारक कारभार चव्हाट्यावर आणला आहे. कायद्याचा आणि अधिकाराचा अतिवापर हा गैरवापर असल्यासारखाच आहे, आणि कोविड सारख्या महामारीच्या संकटात मदतीला धावून आलेल्या खाजगी डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सला सहकार्य करण्याऐवजी धमक्या देणं आणि वेठीस धरणे नाशिकच्या जनतेच्या हिताचे नाही, असे सर्व डॉक्टरांनी सांगत मनपाने भविष्यात विश्वासार्हता टिकवावी अशी अपेक्षा व्यक्त करून नाशिकच्या जनतेच्या सेवेस आम्ही तत्पर आहोत असे सुश्रुत रुग्णालयाच्या संचालिका डॅा प्राची पवार यांनी सांगितले. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com