गिरीष महाजनांनी दिला संदेश, `टायगर अभी जिंदा है!`

भारतीय जनता पक्षाने आज स्थायी समितीच्या आठ सदस्यांची नियुक्ती केली. त्यात शहरातील मध्य, पश्‍चिम व पुर्व विधानसभा मतदारसंघात समतोल राखला. मात्र मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे समर्थक नगरसेवकांना स्थान मिळाले नाही.
Mahajan- Pharande
Mahajan- Pharande

नाशिक : भारतीय जनता पक्षाने आज स्थायी समितीच्या आठ सदस्यांची नियुक्ती केली. त्यात शहरातील मध्य, पश्‍चिम व पुर्व विधानसभा मतदारसंघात समतोल राखला. मात्र मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे समर्थक नगरसेवकांची नावे यादीतून गळाली. नव्या सदस्यांच्या नियुक्तीत माजी मंत्री गिरीश महाजनांचा वरचष्मा होता. त्यामुळे यातून गिरीश महाजनांनी `टायगर अभी जिंदा है` हा संदेश दिला आहे. 

यासंदर्भात माजी आमदार फरांदे समर्थक चंद्रकांत खोडे, अनिल ताजनपुरे व डॉ. दिपाली कुलकर्णी यांची नावे वगळण्यात आली. फरांदे यांच्या समर्थकांची नावे वगळल्याने हा मोठा पक्षांतर्गत राजकारणात आमदार फरांदे धक्का असल्याची कुजबुज पसरली. माजी मंत्री जयकुमार रावल समर्थक माधुरी बोलकर वगळता इतर सात सदस्यांच्या नावाची घोषणा करताना माजी मंत्री गिरीष महाजन यांचे वर्चस्व दिसले. 

पुर्व विधानसभा मतदारसंघातून रंजना भानसी व गणेश गिते, पश्‍चिम मतदारसंघातून इंदुमती नागरे, प्रतिभा पवार, माधुरी बोलकर व मुकेश शहाणे यांची नियुक्ती करण्यात आली. मध्य विधानसभा मतदारसंघातून अनिल ताजनपुरे, डॉ. दिपाली कुलकर्णी, चंद्रकांत खोडे यांच्या नावाची चर्चा होती. परंतू त्यांच्या नावावर फुली मारत हिमगौरी आहेर-आडके, योगेश हिरे यांची नियुक्ती करण्यात आली. यातून आमदार फरांदे यांना डावलल्याचा संदेश गेला. हिमगौरी आडके ह्या भाजप महिला शहराध्यक्ष पदाबरोबरचं विधानसभा किंवा लोकसभा उमेदवारीसाठी दावेदार मानल्या जात आहेत. माधुरी बोलकर यांचे नाव प्रभारी जयकुमार रावल यांच्याकडून पुढे करण्यात आल्याचे बोलले जाते. त्याव्यतिरिक्त सर्व नावे गिरीष महाजन यांनी निश्‍चित केल्याचे बोलले जाते. त्यामुळे गिरीष महाजन पर्व अद्याप संपलेले नाही याची जाणीव झाली आहे.

सदस्य अहमदाबादला
महापौर निवडणुकीचा अनुभव पाठीशी असल्याने यंदा महापालिकेतील स्थायी समितीची सत्ता हातून जावू नये म्हणून भाजपने नियुक्त होणा-या सदस्यांची बुधवारी पहाटे अहमदाबादला रवानगी केली. भाजप सदस्यांच्या जोडीला मनसेचे सलीम शेख देखील जाणार असल्याने स्थायी समितीवर भाजपची सत्ता अबाधित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

निलेश बोरा किंगमेकर?
बहुमत असूनही महापौर निवडणुकीत सत्ता मिळविताना भाजपच्या नाकीनऊ आले होते. सत्तेचे पारडे पुन्हा आपल्याकडे फिरविण्यात भाजपला यश आले. स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत देखील बहुमत असले तरी फाटाफुटीची शक्यता होती त्यावेळी गिरीष महाजन समर्थक व व्यापारी निलेश बोरा यांनी पडद्यामागून सुत्रे हलवल्याचे बोलले जाते. त्यांनी महत्वाची भुमिका पार पाडली होती. स्थायी समिती सदस्यांची नावे निश्‍चित करताना पुन्हा बोरा हेच किंगमेकर ठरल्याची चर्चा आहे.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com