छत्रपती संभाजी राजेंच्या मताने पुढील दिशा ठरवू - Future action on Maratha reservation will be decide, Maratha Resrvation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

छत्रपती संभाजी राजेंच्या मताने पुढील दिशा ठरवू

प्रमोद दंडगव्हाळ
बुधवार, 5 मे 2021

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) कसे मिळवता येईल याची रणनिती ठरवावी लागेल. त्यासाठी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या नेतृत्वाखाली पुढील दिशा ठरवू, असे माजी आमदार तसेच मराठा आंदोलनातील नेते माजी आमदार डॅा अपूर्व हिरे (Dr Apurv Hire) यांनी सांगितले. 

नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले. त्यामुळे कोणालाही दोष देता येणार नाही. यापुढे मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) कसे मिळवता येईल याची रणनिती ठरवावी लागेल. त्यासाठी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या नेतृत्वाखाली पुढील दिशा ठरवू, असे माजी आमदार तसेच मराठा आंदोलनातील नेते माजी आमदार डॅा अपूर्व हिरे (Dr Apurv Hire) यांनी सांगितले. 

ते म्हणाले, मराठा आरक्षण टिकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकार आणि सध्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारने चांगले प्रयत्न केले आहेत. त्यामुळे कोणालाही दोष देण्यात काहीच अर्थ नाही. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण रद्द केले असले, तरी मराठा समाजाने आता संयम बाळगणे आवश्यक आहे. सध्याच्या धोरणाची परिस्थिती पाहता आपण स्वतःची आणि समाजातील नागरिकांची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे आंदोलन किंवा उद्रेक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन शांतता ठेवावी. त्यालाच प्राधान्य दिले पाहिजे. 

ते पुढे म्हणाले, आरक्षणासाठी कोणतेही टोकाचे पाऊल उचलण्याची ही वेळ नाही. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे आता काहीतरी मार्ग काढणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित प्रयत्न करण्याची गरज नाही. राज्य सरकारने सुपर न्युमररी सूत्राचा वापर करून शैक्षणिक संस्थांमधील जागा वाढवाव्यात. न्यायालयाने आरक्षण रद्द केले असले तरी आता ठाकरे सरकारने हे आरक्षण दिले पाहिजे. यासंदर्भात खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी घेतलेले सर्व निर्णय मान्य असतील. यापुढे त्यांच्या आदेशान्वये निर्णय घेणार आहे.
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख