अर्थमंत्र्यांनी बॅंकांच्या गर्दी, सोयीचा विचार करायला नको का?

बॅंका या अर्थव्यवस्थेच्या वाहिन्या आहेत. त्यांचे कामकाज, प्रक्रीया व रजांवर केंद्रीय अर्थमंत्रालयाचे बारीक लक्ष असते, असा यापूर्वीच्या सरकारच्या अर्थमंत्र्यांच्या कामकाजाचा अनुभव नागरिकांना आहे. सध्या मात्र सगळेच देवाच्या भरवशावर आहे की काय? अशी शंका येऊ लागली आहे
Bank Crowd
Bank Crowd

नाशिक : बॅंका या अर्थव्यवस्थेच्या वाहिन्या आहेत. त्यांचे कामकाज, प्रक्रीया व रजांवर केंद्रीय अर्थमंत्रालयाचे बारीक लक्ष असते, असा यापूर्वीच्या सरकारच्या अर्थमंत्र्यांच्या कामकाजाचा अनुभव नागरिकांना आहे. सध्या मात्र सगळेच देवाच्या भरवशावर आहे की काय? अशी शंका येऊ लागली आहे

येत्या आठवड्यात सहा दिवस सुटी व एक दिवस कामकाज आहे. त्यात बॅंकांतील संभाव्य गर्दीने कोरोना प्रसाराला आयतीच संधी मिळणार आहे. यात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी हस्तक्षेप करणे अपेक्षीत होते. मात्र तसे काहीही दिसत नसल्याने कोरोना प्रसार व अर्थव्यवस्थेला त्याचा त्रास सहन करावा लागेल, अशी भिती आहे. 

यापूर्वी बॅंकांना सलग तीन ते चार दिवस सुटी असल्यास केंद्र सरकार त्यात हस्तक्षेप करुन बॅंकांना मधल्या काळात सुटी पुढे करून कामकाजाच्या सूचना देत होते. त्यामुळे प्रदिर्घ काळ बॅंका बंद राहिल्यास त्याने अर्थव्यावहारांवर येणारा ताण कमी होत असे. यापूर्वी असे प्रसंग अनेकदा आले. त्यात केंद्र सरकारने हस्तक्षेप देखील केला. मात्र सध्या असे काहीच न झाल्याने सलग सहा दिवस कामकाज बंद राहणार आहे. त्याचा एटीएम, बॅंका, रोखीचे व अन्य व्यवहार याचे काम होणार हा चिंतेचा विषय आहे. 

मागील आठवड्यात चौथा शनिवार, नियमित साप्ताहिक सुटीचा रविवार व धूलिवंदनाच्या सुटीच्या सोमवार (ता. २९) त्यानंतर मंगळवारी (ता. ३०) आर्थिक हिशेब पूर्ण करण्यासाठी एकच दिवस शिल्लक आहे. यामुळे शहरातील खासगी, सरकारी व सहकारी बॅंकांमध्ये मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे बॅंक प्रशासनासह महापालिकेच्या वैद्यकीय विभागासमोर गर्दी नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. गर्दीच्या माध्यमातून कोरोना संसर्गाचा धोका परवडणारा नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ३१ मार्चला बॅंकांचे व्यवहार पूर्णपणे बंद राहतात. गेल्या आठवड्यात शनिवार ते सोमवार अशी तीन दिवस सुटी आहे. त्यामुळे ३० मार्च या एकमेव दिवशी बॅंकांचे व्यवहार सुरू राहणार आहेत. ३१ मार्चनंतर १ एप्रिलला बॅंकांचा क्लोजिंग डे असतो. त्यानंतर पुन्हा तीन दिवस सुटी राहणार असल्याने ३० मार्च या एकाच दिवशी बॅंकांचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी शिल्लक असल्याने या दिवशी बॅंकांमध्ये गर्दी उसळणार आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता, बॅंकेसह पालिकेच्या वैद्यकीय विभागासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. 

कोरोना संसर्गाचा धोका 
साडेसहा तासांच्या बॅंक वेळेत जीएसटी भरणा, चलन, मुद्रांक शुल्क भरणा, करभरणा आदी व्यवहार पूर्ण होतील. मार्चनंतर नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार असल्याने मार्च महिन्यात व्यवहार पूर्ण करण्यासाठी बॅंकांमध्ये गर्दी होणार आहे. सोशल डिस्टन्स, मास्क व सॅनिटायझरचा योग्य वापर न झाल्यास बॅंकांच्या रांगा कोरोना संसर्ग वाढण्यास कारणीभूत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने बॅंकांमध्ये मोठी गर्दी होणार आहे. बॅंकांनी होणाऱ्या गर्दीचे योग्य प्रकारे नियोजन करावे, बेजबाबदारपणा दिसून आल्यास बॅंकांवर कारवाई करणार आहे. 
- कैलास जाधव, आयुक्त, महापालिका 
...  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com