Eknath Khadse Picture viral Having Placard Mentioning Remove Fadanavis to Save Maharashtra | Sarkarnama

खडसेंच्या हातात 'फडणवीस हटाओ, महाराष्ट्र बचाव'चा फलक? नक्की काय गोलमाल?

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 22 मे 2020

खडसे यांनी भाजप नेतृत्वावर नाराजीची भूमिका उघडपणे जाहिर केली होती, त्यामुळे त्यांच्या या भूमिकेबाबत चर्चा सुरू आहे.याबाबत खडसे यांनी मात्र आपल्या आंदोलनाचा फोटो शिवसेनेच्या कार्यकर्त्याने एडीटींग करून व्हायरल केला असल्याची माहिती मिळत आहे. मात्र आपण शोध घेत आहोत असे त्यांनी 'सरकारनामा'शी बोलतांना सांगितले.

जळगाव : राज्यातील सरकारविरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आज "मेरा अंगण, मेरा रणांगण'असे आंदोलन करण्यात आले. यात राज्यातील नेत्यांनी आपल्या घरीच आंदोलन केले,त्यात अनेक नेत्याच्या होती सरकाविरोधात फलक असल्याचे फोटो प्रसिध्द झाले आहेत. मात्र भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या हाती 'फडणवीस हटाओ, महाराष्ट्र बचाओ'अशा आशयाचा मजकूर असलेला फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने खबबळ उडाली आहे. 

खडसे यांनी भाजप नेतृत्वावर नाराजीची भूमिका उघडपणे जाहिर केली होती, त्यामुळे त्यांच्या या भूमिकेबाबत चर्चा सुरू आहे.याबाबत खडसे यांनी मात्र आपल्या आंदोलनाचा फोटो शिवसेनेच्या कार्यकर्त्याने एडीटींग करून व्हायरल केला असल्याची माहिती मिळत आहे. मात्र आपण शोध घेत आहोत असे त्यांनी 'सरकारनामा'शी बोलतांना सांगितले.

भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभरात आज सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले.यात राज्यातील सर्वच नेते सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या घराबाहेर अंगणात येवून सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. राज्याचे माजी मंत्री व भाजपचे नेते एकनाथराव खडसे हे पक्षावर नाराज असल्याने आंदोलनात सहभागी होतील की नाही, याबाबत सर्वाचे लक्ष होते. मात्र, खडसे हे आंदोलनात सहभागी झाले. मुक्ताईनगरातील आपल्या घराच्या बाहेर अंगणात त्यांनी हातात फलक घेवून राज्यातील सरकारविरोधात घोषणा दिल्या.यावेळी खासदार रक्षा खडसेही सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या या आंदोलनाचे फोटो राजभरात सोशलमिडीयावर प्रसिध्द झाले आहेत.

फोटोचे माॅर्फिंग केले?

मात्र हे आंदोलन संपल्यानंतर एकनाथ खडसे यांचे याच आंदोलनाचे स्वतंत्र फोटो कुणीतरी अज्ञात इसमाने व्हायरल केले, यात एकनाथ खडसे यांच्या हातात 'फडणवीस हटाओ, महाराष्ट्र बचाओ'असा फलक दिसत आहे. आंदोलनातील जो मूळ फोटो होता, त्याच फोटोचा या ठिकाणी उपयोग करण्यात आला आहे. आंदोलनात त्यांच्या हातात 'उध्दवा अजब तुझे....निष्फळ सरकार'असा फलक आहे. मात्र सोशल मिडीयावर याच फोटोत त्यांच्या हांतात 'फडणवीस हटाओ..महाराष्ट्र बचाओ' असा फलक दाखविण्यात आला आहे. या फोटोमुळे मात्र सर्वत्र खळबळ उडाली आहे.

याबाबतीत खडसे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, की हा खोडसाळपणा करण्यात आला आहे, याबाबत शोध घेतला असता शिवसेनेच्या कार्यकर्त्याने हे केल्याचे माहिती मिळाली आहे, मात्र त्याबाबत माहिती घेत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख