`या`मुळे रांगेत नाही तर घरबसल्या मिळेल लस, जाणून घ्या कसे!

कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठीचे किचकट निकष, नोंदणी व प्रचंड गर्दीने नागरिक त्रस्त होते. महापालिका आयुक्तांनी जागतिक निविदाद्वारे लस खरेदीचे सुतोवाच केले आहे. त्यामुळे मुबलक लस उपलब्ध होईल. नागरिकांना घरबसल्या लस प्राप्त होईल. या धोरणाचा सर्वप्रथम `सरकारनामा`ने सर्वप्रथम आणि वारंवार पाठपुरावा केला होता.
kailas Jadhav
kailas Jadhav

नाशिक : कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठीचे किचकट निकष, नोंदणी व प्रचंड गर्दीने (Crowd and lines for vaccination) नागरिक त्रस्त होते. महापालिका आयुक्तांनी जागतिक निविदाद्वारे लस खरेदीचे सुतोवाच केले आहे. (MNC Commisioner Kailas Jadhav says for Globol Tender) त्यामुळे मुबलक लस उपलब्ध होईल. नागरिकांना घरबसल्या लस (Now Vaccination will be Easier) प्राप्त होईल. या धोरणाचा सर्वप्रथम `सरकारनामा`ने सर्वप्रथम आणि वारंवार पाठपुरावा केला होता.    

कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होत नसल्याने मुंबई व ठाणे महापालिकेच्या धर्तीवर नाशिक महापालिकादेखील लस खरेदी करण्याच्या तयारीत आहे. लसींसाठी स्वतंत्र निविदाप्रक्रिया न राबवता मुंबई व ठाणे महापालिकेच्या ग्लोबल टेंडरनुसार त्याच किमतीमध्ये खरेदी केली जाईल, अशी माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

यासंदर्भात `सरकारनामा`ने या विषयाकडे लक्ष वेधले होते. त्याचा वारंवार आग्रह बातम्यांतून केला होता. ही प्रक्रीया केल्यास आगामी काळात नाशिककरांना रांगेत उभे न राहता व नियोजनानुसार वेळेत लस मिळू शकेल. 

१६ जानेवारीपासून नाशिक शहरामध्ये लसीकरण सुरू झाले. मात्र गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून लस उपलब्ध होत नसल्याने आणि अनियमितता सुरू आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सरकारकडून लस कधी उपलब्ध होईल, याबाबत सांशकता आहे. मात्र लसीकरणाचा महत्त्वाचा टप्पा पार पाडण्यासाठी महापालिकेने मुंबई व ठाण्याच्या धर्तीवर खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तातडीने लस मिळत असेल तर विलंब न लावता मुंबई व ठाणे महापालिका यांनी ज्या दरांमध्ये लस विकत घेतली त्याच दरात महापालिकादेखील लस खरेदी करेल, अशी माहिती आयुक्त जाधव यांनी दिली.

महापालिकेच्या वतीने स्वतंत्ररीत्या लसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी स्वखर्चाने लस खरेदी करण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृहनेता, विरोधी पक्षनेता व सर्वपक्षीय गटनेत्यांची आज दुपारी महापौर निवासस्थानी बैठक होणार आहे.

फक्त तीन केंद्रांवर लसीकरण
लस उपलब्ध न झाल्याने मंगळवारी शहरातील फक्त तीन केंद्रांवर तेही ४५ वर्ष वयोगटांत पुढील व्यक्तींना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला जाणार आहे. पंचवटी विभागातील इंदिरा गांधी हॉस्पिटल, सातपूर विभागातील ईएसआय हॉस्पिटल व नाशिक रोड विभागातील खोले मळा आरोग्य उपकेंद्रांवर लस दिली जाईल, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com