CORONA
CORONA

नाशिकला कोरोनामुळे मृत्‍यूचे थैमान; एकाच दिवशी ५७ बळी 

रुग्‍णालयांमध्ये खाटा न मिळणे, ऑक्‍सिजनच्या तुटवड्यासह विविध कारणांमुळे अनेक रुग्‍णांना आरोग्यसेवा उपलब्‍ध होत नसल्‍याची स्‍थिती आहे. यातून कोरोनामुळे मृत्‍यूचे थैमान सध्या सुरू असून, मृतांचा आकडा आटोक्‍याबाहेर चालला आहे. मंगळवारी जिल्ह्यात तब्‍बल ५७ रुग्‍णांचा कोरोनाने बळी घेतला.

नाशिक : रुग्‍णालयांमध्ये खाटा न मिळणे, ऑक्‍सिजनच्या तुटवड्यासह विविध कारणांमुळे अनेक रुग्‍णांना आरोग्यसेवा उपलब्‍ध होत नसल्‍याची स्‍थिती आहे. यातून कोरोनामुळे मृत्‍यूचे थैमान सध्या सुरू असून, मृतांचा आकडा आटोक्‍याबाहेर चालला आहे. मंगळवारी जिल्ह्यात तब्‍बल ५७ रुग्‍णांचा कोरोनाने बळी घेतला. यापैकी चांदवड तालुक्‍यातील दहा मृतांसह नाशिक ग्रामीणमधील एकूण ४३ बाधितांचा मृत्‍यू झाला आहे. 

गेल्‍या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृतांच्‍या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी (ता. २०) मृतांच्‍या संख्येने यापूर्वीचे सर्व उच्चांक मोडून काढले. अक्षरशः कोरोनामुळे होणाऱ्या मृत्‍यूंमध्ये जिल्‍हावासीय हादरले असून, जिल्ह्यात प्रथमच एका दिवसात पन्नासहून अधिक बाधितांचा मृत्‍यू झाला आहे. आरोग्‍यसेवांच्या उपलब्‍धतेअभावी तर मृतांची संख्या वाढत नाही ना, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. दिवसभरातील मृतांमध्ये सर्वाधिक ४३ मृत नाशिक ग्रामीण भागातील आहेत. चांदवड तालुक्‍यातील सर्वाधिक दहा, येवला आणि नांदगाव तालुक्‍यातील प्रत्‍येकी सात, निफाड तालुक्‍यातील सहा, नाशिक महापालिका क्षेत्रालगत असलेला नाशिक तालुक्‍यातील पाच, त्र्यंबकेश्‍वर व पेठ तालुक्‍यातील प्रत्‍येकी दोन आणि मालेगाव ग्रामीण आणि सिन्नर तालुक्‍यातील एका मृताचा समावेश आहे. नाशिक शहरातील नऊ, मालेगाव महापालिका क्षेत्रातील तीन, तर जिल्‍ह्याबाहेरील ठाणे आणि औरंगाबाद येथील व सध्या नाशिकला उपचार घेत असलेल्‍या बाधितांचा असा जिल्‍ह्याबाहेरील दोघा बाधितांनी जीव गमावला आहे. 

बळींमध्ये २८ ज्‍येष्ठ नागरिक 
जिल्ह्यातील एकूण बळींमध्ये तब्‍बल सहा मृत चाळिशीच्‍या आतील आहेत. विजापूर (जि. औरंगाबाद) येथील २३ वर्षीय तरुणासह आशेवाडी (ता. दिंडोरी) येथील ३२ वर्षीय युवक, चांदवड तालुक्‍यातील ३५ वर्षीय दोन महिला, मालेगाव कॅम्‍पमधील ३६ वर्षीय, नाशिक शहरातील त्रिमूर्ती चौकातील ३८ वर्षीय महिलेचा कोरोनाने बळी घेतला. मृतांमध्ये सर्वाधिक २८ मृत वयाची साठी ओलांडलेले अर्थात ज्‍येष्ठ नागरिक आहेत. 

ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्या ४२ हजारांवर 
मंगळवारी आढळलेल्‍या नवीन कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरात दोन हजार ७७७, नाशिक ग्रामीणमध्ये दोन हजार १६७, मालेगावला २१, तर जिल्‍ह्याबाहेरील ४० रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. तुलनेत तीन हजार ८६१ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत वाढ झाल्‍याने हा आकडा ४२ हजारांहून अधिक झाला आहे. सध्या जिल्ह्यात ४२ हजार २४२ रुग्‍णांवर उपचार सुरू आहेत. हादेखील उच्चांकी आकडा आहे.  
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com