जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णसंख्या हजाराच्या आत

बऱ्याच दिवसांनंतर कोरोनाबाधितांची संख्या हजारांपेक्षा कमी झाल्याने दिलासादायक स्थिती आहे. ही संख्या आणखी कमी होण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच, ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

नाशिक : बऱ्याच दिवसांनंतर कोरोनाबाधितांची संख्या हजारांपेक्षा कमी झाल्याने दिलासादायक स्थिती आहे. (After a long time covid19 patients figure came under thousand) ही संख्या आणखी कमी होण्यासाठी प्रयत्न करावेत. (Administration shall take efforts to to control the situation) तसेच, ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhubal)यांनी दिल्या. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलिस आयुक्त दीपक पांडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसीकर, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्कर्ष दुधेडिया, म्युकरमायकोसिस टास्क फोर्सचे डॉ. संजय गांगुर्डे, लसीकरण नोडल अधिकारी डॉ. राजेंद्र चौधरी आदी उपस्थित होते. 

पालकमंत्री भुजबळ म्हणाले, की संभाव्य तिसऱ्या लाटेच्या प्रतिबंधासाठी बालरुग्णालये तयार करण्यात आली आहेत. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या ७५८ वरून घटून सध्या केवळ ४६ रुग्ण आहेत. ६३२ रुग्ण बरे झाले असून, ८० जणांचे मृत्यू झाले. जिल्ह्यातील २२ लाख ११ हजार ७१८ जणांना म्हणजेच ३०.१४ टक्के नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. कोरोना उपाययोजनांसाठी आतापर्यंत ५६ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. रुग्णसंख्या कमी झाली आहे. तीन महिने पुरेल एवढा औषधसाठा, पुरेशा ऑक्सिजनची सोय झाली आहे. 

जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, की जिल्ह्यात तिसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीसाठी साधारण एक हजार खाटा वाढविल्या असून, ९७ टक्के खाटा शिल्लक आहेत. महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात १०० किलोलिटरचे ऑक्सिजन टँक बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. अजून तीन महिने पुरेल इतका औषधसाठा जिल्ह्यात उपलब्ध आहे. आठ ऑक्सिजन प्रकल्पांच्या टेस्टिंगचे काम लवकरच सुरू होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. 
दरम्यान, या बैठकीपूर्वी जिल्‍हा क्रीडा विभागाने तयार केलेल्या ‘चला खेळ खेळूया’ या पुस्तकाचे पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते प्रकाशन झाले. 
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com