शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत `कोरोना`शी लढाई संपणार नाही - covid19 fight wiil not end till last patient recover. Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत `कोरोना`शी लढाई संपणार नाही

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 10 एप्रिल 2021

ठक्कर डोम येथे ३५० बेड्सच्या कोविड केअर सेंटरची पुनर्निमिती ही  महानगरपालिका व क्रेडाई संस्थेने केलेली अत्यंत दर्जेदार आरोग्य सुविधा आहे. कोरोनाचा शेवटचा रुग्ण जोपर्यंत बरा होत नाही, तोपर्यंत ही लढाई संपणार नाही.

नाशिक : ठक्कर डोम येथे ३५० बेड्सच्या कोविड केअर सेंटरची पुनर्निमिती ही  महानगरपालिका व क्रेडाई संस्थेने केलेली अत्यंत दर्जेदार आरोग्य सुविधा आहे. कोरोनाचा शेवटचा रुग्ण जोपर्यंत बरा होत नाही, तोपर्यंत ही लढाई संपणार नाही. क्रेडाई संस्थेच्या  मार्गदर्शन व प्रेरणेतून आज हा उपक्रम सुरु झाला. इतर संस्थांनी देखील कोरोनाच्या या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहन  राज्याचे अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरात बेड्सची संख्या अपुरी पडत आहे. त्यादृष्टीने महानगरपालिका व `क्रेडाई`च्या संयुक्त विद्यमाने ठक्कर डोम येथे पुन्हा एकदा ३५० बेड्सचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण श्री. भुजबळ यांच्या हस्ते आज करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.क्रेडाईचे जितूभाई ठक्कर यांनी या प्रकल्पाच्या प्रतिकात्मक चाव्या महापौरांना सुपुर्त केल्या. 

यावेळी श्री. भुजबळ म्हणाले की, देशात कोविडचा प्रादुर्भाव वाढला त्यावेळी नाशिकमध्ये ठक्कर डोमची व्यवस्था नाशिकमध्ये केली होती. मध्यंतरीच्या काळात कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ही व्यवस्था बंद केली.  मात्र पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ती पुन्हा कार्यान्वित करावी लागत आहे. त्यामुळे प्रादुर्भाव वाढत आहे. उपाय योजना करीत असतांना मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे कोरोना रुग्णांची व्यवस्था करण्यात कमी पडत आहोत ही परिस्थिती आहे. त्यामुळे या कामासाठी खाजगी डॉक्टर, नर्स, परिचारिकांनी पुढे येऊन सहकार्य करावे. .

यावेळी महापौर सतीश कुलकर्णी म्हणाले की, कोरोनाच्या काळात आवश्यकता लक्षात घेवून पुन्हा एकदा नाशिककरांसाठी `क्रेडाई` ने कोविड केअर सेंटरची केलेली निर्मिती ही कौतुकास्पद बाब आहे. महापालिका आणि शासनाच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात करण्यात येत आहे. नागरीकांनी घाबरून न जाता वेळेत उपचार व निर्बंधांचे पालन करून सहकार्य करावे. 
अध्यक्ष रवी महाजन यांनी कोविडचा प्रसार रोखण्यासाठी पुन्हा एकदा सामाजिक जबाबदारी म्हणून क्रेडाई संस्था यात उतरली आहे. समाजातील इतर संस्थांनी देखील सामाजिक जबाबदारी चे भान ठेवून कोरोनाच्या या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, मनपा गटनेते सतीश सोनवणे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, मनपा उपायुक्त मनोज घोडे पाटील, मनपा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे,डॉ.राजेंद्र भंडारी यांच्यासह क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन, उपाध्यक्ष कृणाल पाटील,रंजन ठाकरे, विष्णुपंत म्हैसधुणे, जितूभाई ठक्कर, सुरेश पाटील, गौरव ठक्कर, अनिल आहेर, सचिन बागड, मनोज खिवसरा, रंजन भलोडीया, राजेश आहेर, हंसराज देशमुख, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, सागर शहा, सतीश मोरे उपस्थित होते.
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख