अड्डा तोडायला आलेल्या नगरसेवकावर दारू विक्रेत्याचा हल्ला!

नाक्यात काही वर्षांपासुन सर्रास दारु विक्री करण्यात येत होती. नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी मनपाच्या अतिक्रमण विभागाला पाचारण करुन नाका तोडत असतांना दारु विक्रेत्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवल्याने खळबळ उडाली.
Jakat Naka
Jakat Naka

जळगाव : शिवाजीनगर लाकूडपेठेत (Shivajinagar Lakudpeth) कानळदा रोडवर तत्कालीन नगरपालिकेने जकात नाका (Octroi plaza) उभारला होता. जकात वसुली बंद झाली. त्यानंतर या नाक्यात काही वर्षांपासुन सर्रास दारु विक्री (Unauthorised liquer selling in abandon Octroi plaza) करण्यात येत होती. नगरसेवक नवनाथ दारकुंडे (Navnath Darkunde) यांनी  मनपाच्या अतिक्रमण विभागाला पाचारण करुन नाका तोडत असतांना दारु विक्रेत्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवल्याने खळबळ उडाली.

अनेक तक्रारी या नाक्या संदर्भात हेात्या. काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली. चार ते पाच जणांनी नगरसेवक दारकुंडे यांची गचांडी धरुन दगडाने मारहाण केली. शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. 

जळगाव शहरात चारही दिशांनी प्रवेश करण्याच्या मुख्य मार्गावर तत्कालीन नगरपालिकेले जकात नाके उभारले होते. पक्के बांधकाम करुन उभारलेल्या या खोल्यांमध्ये गैरकृत्यांसह अवैध धंदे चालवले जात असल्याच्या नगरसेवकांच्या तक्रारी होत्या. त्यानुसार महापालिकेने या सर्व जकात नाक्यांना जमीनदोस्त करण्याचा निर्णय या आगोदरच घेतला आहे. 

काही नाके पाडण्यातही आले होते. मात्र, कानळदा रेाडवर शिवाजीनगर लाकूड पेठेतील जकात नाका तसाच राहीला. तेथे चक्क हातभट्टीची दारु विक्री हेात असल्याचे आढळून आले. गेल्या देान वर्षापासून परिसरातील रहिवासी नागरीकांकडून पेालिस आणि महापालिकेला वारंवार तक्रारी करुनही उपयोग झाला नाही. अखेर शिवाजीनगरातील नगरसेवक नवनाथ दारकुडे यांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाला पाचारण करून आज जकात नका पाडण्यास सुरवात केली. महापालकेचे देान ट्रॅक्टर आणि जेसीबीद्वारे बांधकाम पाडले जात असतांनाच दुपारी १ वाजेच्या सुमारास दारुच्या नशेतील महेश पवार, रवी पवार, मोती दशरथे व अजय तांबोळे यांच्यासह आणखी एक अनोळखी अशा पाच जणांनी नाका तोडण्यास विरोध केला. नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांना शिवीगाळ करून हातात दगड घेत त्यांच्यावर हल्ला चढवला. हाणामारीत दारकडे यांच्या डोक्यावर आणि बोटाला दुखापत झाली. असे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्या तक्रारीत नमुद आहे. 

नगरसेवका कडूनच मारहाण 
दुसरीकडे हमाल असलेल्या महेश पवार, रवी पवार, अजय तांबोळे या तरुणांमध्ये आपसात शिवीगाळ सह किरकोळ वाद सुरु होता. आपल्यालाच शिवीगाळ करत असल्याचा नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांचा गैरसमज झाला. त्यातून कुठलेही कारण नसतांना मारहाण करण्यास सुरवात केली. या मारहाणीत महेश पवार याचे तोंड फुटले असून रक्तबंबाळ अवस्थेत तो, पोलिस ठण्यात तक्रार देण्यासाठी आला हेाता. मारहाणीत महेश पवार तसेच अजय तांबोळे हे दोन्ही जखमी झाले आहेत.जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

दारुड्यांचा दवाखान्यात गोंधळ 
शहर पेालिसांनी दोघा जखमींना उपचारासाठी मेमो देत, जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवले. येथे आल्यावर दारुच्या नेशेतील दोघांनी रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांसह डॉक्टरांनाच शिवीगाळ केल्याने रुग्णालयात गोंधळ उडाला...दोघांनी उपचार नकरताच पुन्हा पोलिस ठाणे गाठल्यावर पोलिस गाडीतू देाघांना नेण्यात येवुन त्यांची मल्लम पट्टी करण्यात आली. या प्रकरणी परस्पर विरुद्ध तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com