महापालिका निवडणूका कोरोनामुळे लांबणार? - Corporation Election may delay due to Covid, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

महापालिका निवडणूका कोरोनामुळे लांबणार?

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 मे 2021

https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nashik/mp-dr-pawar-shall-agitation-delhi-vaccine-nashik-politics-75782पुढील वर्षी होणाऱ्या नाशिकसह राज्यातील महापालिकांची निवडणूक कोरोना संसर्गामुळे लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. नियमाप्रमाणे निवडणुकीपूर्वी सहा महिने एखादी जागा रिक्त झाल्यास त्या जागेवर पोटनिवडणूकदेखील घेता येत नसल्याने शहरात रिक्त तीन जागांवरदेखील पोट निवडणूक होणार नाही.

नाशिक : पुढील वर्षी होणाऱ्या नाशिकसह राज्यातील महापालिकांची निवडणूक कोरोना संसर्गामुळे लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. नियमाप्रमाणे निवडणुकीपूर्वी सहा महिने एखादी जागा रिक्त झाल्यास त्या जागेवर पोटनिवडणूकदेखील घेता येत नसल्याने शहरात रिक्त तीन जागांवरदेखील पोट निवडणूक होणार नाही.

नाशिक महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिकची मुदत मार्च २०२२ मध्ये संपुष्टात येत आहे. त्यापूर्वी जानेवारीत निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते. यंदा कोरोनामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विषय समित्या, प्रभाग समिती सभापती, पोटनिवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचबरोबर राज्यातील कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, औरंगाबाद महापालिकांची मुदत संपूनही निवडणुका झाल्या नाहीत. २०२२ मध्ये ज्या महापालिकांचा मुदत संपुष्टात येणार आहे.

नाशिक महापालिकासोबतच राज्यातील निवडणुकीला पात्र असणाऱ्या महापालिकांची व नगरपालिकांची एकत्रित निवडणूक घेण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. परंतु सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात तिसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे. कोरोनाची तिसरी लाट पहिल्या दोन लाटांपेक्षाही भयानक राहणार असून या लाटेमध्ये लहान मुले बाधित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अंदाजानुसार सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात लाट आल्यास डिसेंबरपर्यंत पुन्हा कडक निर्बंध लावले जातील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरू होतील, मात्र गर्दी करता येणार नाही. कोरोना संसर्गाला गर्दी कारणीभूत ठरू नये, यासाठी जानेवारी २०२२ मध्ये होणारी निवडणूक पुढे ढकलली जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात राज्यातील महापालिकेकडून शासनाने अहवाल मागविले याचे वृत्त आहे.

तर प्रशासकीय राजवट!
कोरोनामुळे महापालिकेची निवडणूक पुढे ढकलली गेल्यास प्रशासकीय राजवट लागू होईल. महापालिकेचा सर्व कारभार नियमानुसार आयुक्तांच्या नेतृत्वाखाली चालविला जाईल. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार सहा महिने निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार आहे. तेवढ्या कालावधीसाठी किंवा त्याच्या आत शासन निवडणुका घेवू शकते..

पोटनिवडणुका अशक्यच
नाशिक महापालिका क्षेत्रात तीन महिला नगरसेविकांचे निधन झाल्यामुळे तीन प्रभाग पोट निवडणुकांसाठी पात्र आहे. यातील प्रभाग क्रमांक चारच्या नगरसेविकेचे निधन दीड वर्षांपूर्वी झाले. या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम गेल्या वर्षी मार्च २०२० मध्ये जाहीर करण्यात आला होता. परंतु लॉकडाउनमुळे निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. अद्यापही या प्रभागातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. त्यासोबतच आता दोन जागा रिक्त झाल्याने एकूण तीन जागांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम अपेक्षित आहे. नियमानुसार पोटनिवडणूक घ्यायचे असेल तर मतदार याद्या तयार करण्यापासून तर मतदार केंद्रांची संख्या निश्चित करण्यापर्यंत हा कार्यक्रम राबविला जातो. त्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. त्यानंतर निवडणूक झाली तरी अल्प कालावधीसाठी निवडणूक घेणे परवडणारे नसल्याने पोट निवडणूक देखील होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्र महापालिका अधिनियम प्रकरण दोनमधील १५ चा एक मध्ये निवडणुकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
...
हेही वाचा...

खासदारताई लसीसाठी दिल्लीत धरणे धरा ना

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख