आयुक्त जाधव यांचे महापौरांना खुले आव्हान!

महापौरपद राजकीय स्वरूपाचे असल्याने आरोप-प्रत्यारोप होत राहतात. मात्र, मोघम आरोप करणे योग्य नाही. महापौर सतीश कुलकर्णी यांच्याकडे प्रशासनातील गैरकारभाराचे पुरावे असतील, तर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी.
Jadhav- Kulkarni
Jadhav- Kulkarni

नाशिक : महापौरपद राजकीय स्वरूपाचे असल्याने आरोप-प्रत्यारोप होत राहतात. (Mayor post is political so allegations & Countercharg is there) मात्र, मोघम आरोप करणे योग्य नाही. (but baseless blaiming is not well) महापौर सतीश कुलकर्णी (Satish Kulkarni shall go to ACB if they have any proofs) यांच्याकडे प्रशासनातील गैरकारभाराचे पुरावे असतील, तर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आव्हान आयुक्त कैलास जाधव (Kailas Jadhav) यांनी दिले. 

प्रशासनप्रमुख म्हणून उत्पन्न व खर्चाच्या बाजू लक्षात घेऊनच कुठे खर्च करायचा आणि कुठे नाही, याचे भान असून, त्यानुसारच विकासकामे करण्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले. 

महापौर कुलकर्णी यांनी गेल्या महिन्यात प्रशासनाला अंदाजपत्रक सादर करताना सव्वाशे कोटी रुपये वाढवत दोन हजार ८८३ कोटी रुपयांवर अंदाजपत्रक नेऊन ठेवले. त्यात विविध कामांचा समावेश करताना शंभर कोटींचे कर्जरोखे काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आयुक्त जाधव यांनी महापालिकेच्या उत्पन्नाचा विचार करता प्रशासनाच्या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी करण्याबरोबरच ऋण काढून सण साजरे न करण्यावर मत व्यक्त केले व कर्जरोखे काढणार नसल्याचे स्पष्टीकरण दिल्यानंतर ‘महापौर विरुद्ध आयुक्त’ असा सुप्त संघर्ष सुरू झाला. 

महापौर कुलकर्णी यांनी प्रशासनावर निशाणा साधताना अधिकाऱ्यांमधील असमन्वय, विकासकामांना विलंब, परसेवेतील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार व थेट आरोप न करता टक्केवारीकडे अंगुलीनिर्देश केला. या पार्श्‍वभूमीवर आयुक्त जाधव यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आरोप-प्रत्यारोप होत असतात. महापौर त्यांच्या जागेवर, तर प्रशासन त्यांच्या जागेवर बरोबर आहे. गैरकारभारासंदर्भात महापौरांकडे पुरावे असतील, तर त्यांनी माझ्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पुरावे द्यावेत, असे आव्हान त्यांनी दिले. 

कर्जाविषयी स्पष्टीकरण हवे 
कर्ज काढण्याला माझा विरोध नाही. मात्र, कोणत्या कामांसाठी कर्ज काढायचे, याचे स्पष्टीकरण हवे. महापालिकेला उत्पन्न मिळेल अशा कामांसाठी कर्ज काढण्याला माझा विरोध नाही. प्रशासनाकडून अंदाजपत्रक वेळेत पोहोचल्याचे स्पष्टीकरण देताना उत्पन्नाचा आढावा घेऊनच अंमलबजावणी केली जाणार असल्याचे आयुक्त जाधव यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. 

महपालिकेचे उत्पन्न घटले
कोरोनामुळे पालिकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाल्याचे कबुली देताना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा विचार करता आरोग्य व वैद्यकीय विषयांवरच खर्चाला प्राधान्य दिले जाणार आहे. विकासकामे केली जातील. परंतु त्यासाठी प्राधान्यक्रम ठरविला जाईल. त्यानंतरच निर्णय घेऊ. पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका होणार असल्याने त्यासाठी पन्नास कोटी अंदाजित खर्च येणार असल्याचे स्पष्टीकरण दिले. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com