रियॅलिटी चेकसाठी सूरज मांढरे भरउन्हात मेडिकल स्टोअरवर - Collector Suraj Mandhre at Medical stores for reality check. Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

रियॅलिटी चेकसाठी सूरज मांढरे भरउन्हात मेडिकल स्टोअरवर

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 एप्रिल 2021

भरउन्हात डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन घेऊन रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी मेडिकल दुकानांचे उंबरठे झिजविणाऱ्या, रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळविण्यासाठी उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांची धावाधाव आजही सुरू होती.

नाशिक : भरउन्हात डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन घेऊन रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी मेडिकल दुकानांचे उंबरठे झिजविणाऱ्या, रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळविण्यासाठी उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांची धावाधाव आजही सुरू होती.

दरम्यान, तक्रारीनंतर आज जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी भरउन्हात डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन घेऊन रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी रांगा लावून तिष्ठत मेडिकल दुकानांचे उंबरठे झिजविणाऱ्या बाधितांच्या नातेवाइकांच्या भेटी घेऊन आढावा घेत त्यानंतर उपचार सुरू असलेल्या गरजूना इंजेक्शन उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.

नाशिक जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजक्शनचा तुटवडा कायम आहे. जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तुडवड्याबाबत आज जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आढावा घेत खात्री करून घेतली. श्री. मांढरे यांनी स्वतः रांगेत उभे असलेल्या गरजू रुग्णांच्या नातेवाइकांकडील बाधित असल्याचे रिर्पोट आणि प्रिस्क्रिप्शन तपासले.

रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठीची नागरिकांची वणवण कामय आहे. वाढत्या प्रादुर्भावात रुग्‍णांची अत्यावस्थता वाढत असल्याने रुग्णालयाकडून नानाविध औषधोपचार इंजेक्शनची मागणी केली जाते. त्यापैकी रेमडेसिव्हिर हा एक पर्याय सुचविला जातो. सहाजिकच शहरातील मोठ्या संख्येने रुग्णालयांकडून रेमडेसिव्हर इंजेक्शनसाठी शिफारस केली जात आहे. सहाजिकच भावनाविवश रुग्णांचे नातेवाईक उन्हातान्हात वणवण करीत, मेडिकल दुकानासमोर रांगा लावत आहे. दोन दिवसांपासून रांगा कमी होईना, वाढत्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पाहणी करून रेमडेसिव्हीर उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.

वितरणासाठी प्रोटोकॉल
रुग्णालयाचे शिफारसपत्राच्या मूळ प्रती संबंधित औषध विक्रेत्यांनी जतन करून ठेवणे, तसेच तपासणीच्या वेळी तातडीने उपलब्ध करून देणे आवश्यक असणार आहे. संबंधित रुग्णाचे आधारकार्ड किंवा फोटो असलेला पुरावा, तसेच शासनाने वेळोवेळी निश्चित केलेले अन्य कागदपत्रं उपलब्ध करून देणे बंधनकारक असणार आहे. औषध विक्रेत्यांनी संबंधित प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे स्कॅन करून ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्या मुळे रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांना रेमडेसिव्हिर अग्रक्रमाने उपलब्ध होईल व अनावश्यक खरेदी करण्यास आळा बसेल,

हवी ऑनलइन सोय
रेमडेसिव्हिर इंजेक्शन डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय दिले जात नाही. डॉक्टरांकडून गरजू रुग्णांसाठी प्रिस्क्रिप्शन दिले जाते म्हणून गरजूंचे नातेवाइकांना फिरावे लागते आहे. बंद, जमावबंदी हे सगळे नियम असूनही बाधितांच्या नातेवाइकांना रांगा लावाव्या लागत आहे. इंजेक्शन थेट रुग्णालयांना उपलब्ध करून देण्याची सोय केल्यास त्यासाठी ऑनलाइन इंजेक्शन मिळण्‍याची सोय झाल्यास, नागरिकांची गर्दी कमी होउन काळाबाजाराला आळा बसण्यास मदत होईल. मात्र तशी कुठलीच व्यवस्था नाही. त्या मुळे उन्हातान्हात रांगा लावण्याची नातेवाइकांवर वेळ आली आहे.

रेमडेसिव्हिर महत्त्वाचे इंजेक्शन आहे. मी स्वता रियॅलिटी चेक केले. त्यात असे आढळले, की बरेच लोक प्रिस्क्रिप्शन घेतात आणि इंजेक्शनसाठी गर्दी करतात. रेमडेसिव्हिरच्‍या वापराचे काही नियम आहे. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ते दिले जातात. सरसकट सगळ्यांना जे ॲडमिट आहे, तसेच त्यांना गरज आहे, डॉक्टरांनी तसे प्रमाणित केले आहे अशा उपचार सुरू असलेल्या रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. - सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक.
....
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख