भाजपच्या आंदोलनाकडे चित्रा वाघ यांनी फिरवली पाठ

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून शिवसेनेचे राज्यमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी आज सिडको येथे भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होते. त्याची पूर्वप्रसिद्धीही झाली होती. मात्र आंदोलनाच्या वेळी शहरात असुनही चित्रा वाघ त्याकडे पाठ फिरवली.
Seema Hire
Seema Hire

सिडको :  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून  शिवसेनेचे राज्यमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी आज सिडको येथे भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होते. त्याची पूर्वप्रसिद्धीही झाली होती. मात्र आंदोलनाच्या वेळी  शहरात असुनही चित्रा वाघ त्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.  

पूजा चव्हाण आत्महत्ये प्रकरणी शिवसेनेचे नेते व वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाने चांगलेच रान पेटवले आहे. यासंदर्भात सातत्याने व विविध शहरात जाऊन महिला आघाडीच्या नेत्या पत्रकार परिषदा घेत आहेत. या विषयावर पक्षाचे सर्वच नेते अतिशय आक्रमक आहेत. त्याअनुषंगाने आज प्रदेश उपाध्यक्षा वाघ यांच्या उपस्थितीत सिडको येथील त्रिमूर्ती चौकात चक्का जाम आंदोलन होणार होते. त्यासाठी सोशल मिडजीयासह सगळीकडे प्रचार झाला होता. त्यामुळे पोलिस प्रशासनासह सगळ्यांनाच या आंदोलनात काय होणार याची उत्सुकता होती. सकाळी दहाला हे आंदोलन होणार होते. त्यानंतर वाघ पत्रकार परिषदेला संबोधीत करणार होत्या. 

या आंदोलनासाठी भाजपच्या महिला सकाळी जमा झाल्या होत्या. त्यांनी बराच वेळ वाघ यांची प्रतिक्षा केली. मात्र त्या आंदोलनाला येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे आमदार सीमा हिरे यांसह महिला आघाडीच्या पदाधिका-यांनी आंदोलन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात विविध मागण्यांचे फलक घेतलेल्या महिलांनी घोषणाबाजी केली. राज्य सरकार, वनमंत्री राठोड व मुख्यमंत्री या सगळ्यांना लक्ष्य करण्यात आले. आंदोलनानंतर पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेऊन सोडून दिले. 

याप्रसंगी आमदार हिरे म्हणाल्या, या आत्महत्ये प्रकरणी थेट वनमंत्र्यावर आरोप झाले आहेत. यासंदर्भात सरकारची भूमिका संबंधीत दोषी मंत्र्याना वाचविण्याची आहे. वनमंत्र्यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा. अन्यथा हे सरकार महिला विरोधी असल्याचा संदेश जात आहे. स्वतः राठोड यांनी समाजाची ढाल करुन लपण्याचा बहाणा करु नये. त्यांनी स्वतःच नैतीकतेचा विचार करुन राजीनामा द्यावा. 

यावेळी रोहिणी नायडू, जिल्हा परिषद सदस्या मनिषा पवार, नगरसेविका अलका अहिरे, भाग्यश्री ढोमसे, छाया देवांग, संध्या कुलकर्णी, रश्मी हिरे, मंजुषा दराडे, पुर्वा सावजी, शिल्पा पारनेरकर, अर्चना दिडोरकर यासह भाजपा महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com