येवल्यात भुजबळांचे शिलेदार तेच...मतदाराकंडून खांदेपालट !

येवला विधानसभा मतदारसंघात मतदारांनी कधी नव्हे इतका धक्कादायक कौल दिला. मतदारांनी प्रस्थापितांच्या नेतृत्वाला नाकारले. नवयुवकांनी बाजी मारली. सर्वच प्रमुख ग्रामपंचायतींत परिवर्तनाच्या लाटेत नव्या चेहऱ्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या आल्या.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

येवला : येवला विधानसभा मतदारसंघात मतदारांनी कधी नव्हे इतका धक्कादायक कौल दिला. मतदारांनी प्रस्थापितांच्या नेतृत्वाला नाकारले. नवयुवकांनी बाजी मारली. सर्वच प्रमुख ग्रामपंचायतींत परिवर्तनाच्या लाटेत नव्या चेहऱ्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या आल्या.  विशेष म्हणजे यात विकास देखील दुय्यम ठरला. एकंदर छगन भुजबळांचे प्रस्थापित समर्थकांच्या हातून सत्ता निसटली...जिंकले ते देखील छगन भुजबळ समर्थकच.

येवला म्हणजे छगन भुजबळ. येवल्याची सत्ता, येवल्याचा विकास अन् राजकारण सगळ्यांचा संबंध थेट राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांच्याशीच जोडला जातो. त्याला ग्रामपंचायत निवडणुकाही अपवाद नाहीत. गेल्या चार विधानसभा निवडणुकांत त्यांच्या मतांची चढती कमान राहिली आहे. त्यामुळे गावागावांत तयार झालेले खंदे समर्थक, कार्यकर्ते व मतदार. विधानसभेला हे सर्व एका झेंड्याखाली येऊन लढतात. माक्त्र गावात गेल्यावर अस्तित्वासाठी परस्परांशी भिडतात. कालच्या निवडणूकीतही तेच झाले. त्यामुळे या निवडणूक भुजबळ समर्थख जिंकले. भुजबळ समर्थक हारले. 

तालुक्यातील ६९ पैकी आठ ग्रामपंचायती अगोदरच बिनविरोध झाल्याने सोमवारी ६१ ग्रामपंचायतींची मतमोजणी तहसीलदार प्रमोद हिले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तालुक्याचे लक्ष लागलेल्या अन्‌ जबरदस्त रस्सीखेच असलेल्या अंगणगावला सत्ताधारी विठ्ठलराव आठशेरे यांना मतदारांनी धक्का दिला. येथे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय बनकर यांच्या पॅनलला सात जागांवर एकतर्फी बहुमत मिळाले.

अंदरसूलला सोनवणेंना धक्का

सर्वांत मोठ्या अंदरसूल येथे किसन धनगे-देशमुख यांच्या पॅनलने नऊ जागांवर विजय मिळवत सत्तापालट घडविला. येथे भुजबळांचे खंदे समर्थक व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकृष्ण सोनवणे व त्यांचे विरोधक व सत्ताधारी मकरंद सोनवणे यांच्यात समेट घडविला. त्यांनी एकत्र येऊन निवडणूकीत पॅनेल केले. ते एकत्र आले पण चमत्कार घडला नाही. त्यांच्या पॅनलला सहा जागा मिळाल्या. तीन जागा अपक्षांना मिळाल्या. येथे काही चमत्कार घडणार का, याकडे लक्ष लागले आहे. अर्थात भुजबळांचे खंदे समर्थक सोनवणेंची सत्ता गेली मात्र विजयी झालेले धनगे व देशमुख हे देखील भुजबळांचे समर्थकच असल्याचा दावा त्यांनी केला. बहुतांश गावांचे हे प्रतिनिधीक चित्र आहे. त्यामुळे या निवडणुकीत भुजबळांचे प्र्सथापित समर्थक काही ठिकाणी पराभूत झाले, तरीही निवडून आले ते देखील भुजबळ समर्थकच. थोट

नगरसूल येथेही सत्तापरिवर्तन

नगरसूल येथेही सत्तापरिवर्तन झाले असून, निकेत पाटील व सुभाष निकम यांच्या पॅनलने येथे बाजी मारली. साताळीत माजी सरपंच भाऊसाहेब कळस्कर यांना मोठा धक्का बसला असून, पी. के. काळे व अर्जुन कोकाटे यांच्या पॅनलने येथे एकहाती सत्ता मिळविली. राजापूर येथेही सत्ताधारी पोपट आव्हाड व प्रमोद बोडके यांना मतदारांनी धक्का दिला. येथे ज्येष्ठ नेते परशराम दराडे व खरेदी-विक्री संघाचे संचालक दिनेश आव्हाड यांच्या पॅनलने अपेक्षितपणे बाजी मारून नऊ जागा मिळवत एकहाती सत्ता मिळविली.
अशीच प्रतिनिधीक राजकीय स्थिती व निकाल जवळपास अनेक गावांत ठरले. त्याला अपवाद शिवसेनेने लढविलेली खींड. अनेक ठिकाणी शिवसेनेने आपला भगवा फडकवला आणि सत्ता राखली.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com