छगन भुजबळांचे यश; नाशिकला वैद्यकीय महाविद्यालय

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय, संलग्नित ४३० खाटांचे रूग्णालय तसेच महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय, संलग्नित ४३० खाटांचे रूग्णालय तसेच  महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापनेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. यासाठी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विशेष प्रयत्न केले आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांप्रमाणे एक हजार लोकसंख्येसाठी १ डॉक्टर आवश्यक आहे . सद्य:स्थितीत राज्यात हे प्रमाण ०.६४ आहे. सध्या डॉक्टरांची कमतरता आहे. डॉक्टरांची बहुतांश पदे रिक्त आहेत . त्यामुळे राज्यातील जनतेस आरोग्यविषयक प्राथमिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात अडचणी निर्माण होतात. आरोग्य सुविधांबाबतची जागरुकता लक्षात घेता नाशिकमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु करणे गरजेचे होते. त्यासाठी पालकमंत्री भुजबळ यांचे विशेष प्रयत्न होते.

नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्नित बऱ्याचशा शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी विनाअनुदानित संस्थांद्वारे विविध आरोग्य विज्ञान अभ्यासक्रम राबविण्यात येतात . तथापि अद्याप विद्यापीठाची पदवी आणि पदव्युत्तर संस्था स्थापन होऊ शकली नव्हती. त्याचा विचार करता  विद्यापीठात १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३० रूग्णखाटांचे रूग्णालय स्थापन करण्यासाठी भुजबळ यांचा प्रयत्न होता. यासोबतच वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत अत्याधुनिक अतिविशेषोपचार आरोग्य सेवा व संशोधनास चालना देण्यासाठी महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्याची भुजबळांची मागणी होती. त्यानुषंगाने याबाबत प्रस्ताव मा.मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. त्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती.

त्यानुसार काढण्यात आलेल्या शासन निर्णयात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३० रूग्णखाटांचे रूग्णालय स्थापन करण्यात येत आहे. सदर वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित रुग्णालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ , नाशिक यांच्या अधिनस्त स्थापन करण्यात येईल . तसेच सदर महाविद्यालय व रुग्णालय , दैनंदिन परिचालन व व्यवस्थापन यासाठी स्वायत्त संस्था म्हणून कार्यरत राहणार आहे. सदर वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित रुग्णालय यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक हे सर्वसाधारण पर्यवेक्षण , व्यवस्थापन व नियंत्रण करणारी यंत्रणा असणार आहे.

नवीन वैद्यकीय महाविद्यालयाकरीता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांप्रमाणे आवश्यक असलेले सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय , नाशिक हे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास तात्पुरत्या स्वरूपात निःशुल्क वापरास उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात आली आहे. प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयासाठी सुमारे रुपये ६२७.६२ कोटी ( अनावर्ती खर्च सुमारे रूपये ३८३.११ कोटी व प्रथम चार वर्षांसाठी आवर्ती खर्च सुमारे रूपये २४४.५१ कोटी ) इतका खर्च अपेक्षित आहे .तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियमाच्या तरतुदीनुसार विद्यापीठामार्फत अभ्यासक्रमाचे व इतर शुल्क निश्चीत करून आकारणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयासाठी  शुल्क व इतर बाबींमार्फत निर्माण होणाऱ्या उत्पन्नाच्या स्त्रोतामार्फत महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयाचे व्यवस्थापन , संचालन इत्यादी सर्वप्रकारच्या आवर्ती खर्चासाठी (वेतनासह) कायमस्वरूपी तरतूद महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत करण्यात आली आहे. विद्यापीठास पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.महाविद्यालयासाठी ४४८ तर रुग्णालयासाठी ९८६ पदांची निर्मिती करण्यात आली आहे. रुग्णालयाच्या बांधकामासाठी २६३.११ कोटी, यंत्रसामग्री आणि उपकरणांची १२० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.
...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com