पोळ्यातून संदेश... शरद पवार हेच शेतकऱ्यांचे तारणहार! 

पशुधन घटले असले तरीही बैल पोळ्याचा सण सगळीकडेच उत्साहात साजरा झाला. बैलांविषयीची कृतज्ञता म्हणून साजरा होणारा पोळा काल बैलांच्या पाठींवर राजकीय नेते, पक्ष व संदेश चित्रीत करून साजरा झाला. विशेषतः मालेगाव, नाशिकला अनेकांना राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार यांची चित्र बैलांच्या पाठीवर रंगविण्यात आली होती.
POla
POla

नाशिक : पशुधन घटले असले तरीही बैल पोळ्याचा सण (Bull festival) सगळीकडेच उत्साहात साजरा (celebrate with joy) झाला. बैलांविषयीची कृतज्ञता (Gratitude towards Bull) म्हणून साजरा होणारा पोळा काल बैलांच्या पाठींवर राजकीय नेते, पक्ष व संदेश चित्रीत करून साजरा झाला. विशेषतः मालेगाव, नाशिकला अनेकांना राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व शरद पवार (Sharad Pawar)  यांची चित्र बैलांच्या पाठीवर रंगविण्यात आली होती. त्यातून शरद पवार हेच शेतकऱ्यांचे तारणहार हा संदेश देण्यात आला.   

मालेगाव परिसरात उत्साहात पोळा साजरा झाला. सजविलेल्या बैलांच्या मिरवणूका निघाल्या. यावेळी हर्षल रवींद्र पवार (पिंपळगाव, ता. मालेगाव) यांनी आपल्या बैल जोडीच्या पाठीवर शरद पवार यांचे चित्र रंगविले होते. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव लिहिण्यात आले होते. त्यातून संकटात असलेल्या शेतकऱ्यांना सध्याच्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार हेच शेतकऱ्यांचे तारणहार असल्याचा सेदेश देण्यात आला होता. 

सजावटीतून लक्षवेधी संदेश 
पिंपळगाव खांब (नाशिक) येथील शेतकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे देवळाली विधानसभा अध्यक्ष सोमनाथ बोराडे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही बैलपोळ्यानिमित्ताने बैल सजावटीतून राजकीय संदेश देत पोळा साजरा केला. 

केंद्रीय कृषी कायदे रद्द होऊ दे.... बळीराजाला न्याय मिळू दे... असा संदेश बैल जोडीवर लिहून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. केंद्रातील कृषी कायदे शेतकऱ्यांवर अन्यायकारक असल्याने हे कायदे रद्द करावे, या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून राष्ट्रीय स्तरावर आंदोलन केले जात आहे. या कायद्यानुसार जर शेतीमालाला भाव मिळाला तर व्यापाऱ्यांचा फायदा होणार आहे. भाव नाही मिळाला तर शेतकऱ्यांची नुकसान होणार आहे. कृषी कायद्यांचा फायदा व्यापाऱ्यांना होणार असून मोठे भांडवलदार पैसे कमावणार आहेत. त्यामुळे बैलपोळ्यानिमित्ताने हे अन्यायकारक कायदे रद्द करावे, अशी मागणी श्री. बोराडे यांनी या निमित्ताने केली. बैलांवर झालर लावून हा संदेश दिल्याने ही बैलजोडी पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरली. गेल्या अनेक वर्षांपासून श्री. बोराडे अशा संदेश द्वारे बैल पोळा साजरा करतात. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com