भाजपच्या यतीन कदमांनी उघड केला टोलचा घोटाळा?

सातत्याने विविध मुद्द्यावरून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या पिंपळगाव बसवंत टोलप्लाझावर पथकर वसुलीत मोठा झोल होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही लूट भाजपचे युवानेते यतीन कदम यांच्या निदर्शनास आली. त्यांनी बनावट पथकर पावतीतून होणारा अपहार उघड केला आहे.
Pimpalgaon Toll
Pimpalgaon Toll

पिंपळगाव बसवंत : सातत्याने विविध मुद्द्यावरून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) टोलप्लाझावर पथकर (Toll Plaza) वसुलीत मोठा झोल (Scam) होत असल्याचा धक्कादायक (Shocking incident) प्रकार समोर आला आहे. ही लूट भाजपचे (BJP) युवानेते यतीन कदम (Yatin Kadam) यांच्या निदर्शनास आली. त्यांनी बनावट पथकर पावतीतून होणारा अपहार उघड केला आहे. 

श्री. कदम यांनी टोलप्लाझा गाठला. पथकर वसुलीचे ठेकेदार कंपनी व महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. गेल्या अडीच वर्षांपासून दिवसाला दहा लाख रुपयांचा अपहार होत असून यात एनएचआयचे अधिकारी व लोकप्रतिनिधींना दाणापाणी पोहोचत असल्याचा आरोप कदम केला. अधिकाऱ्यांनी यावर टोल पथकर वसुलीत अनियमितता होत असल्याची कबुली दिल्याने कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याची शक्यता आहे. 

पिंपळगाव टोलप्लाझावर लोकप्रतिनिधी व प्रवाशांना अरेरावी, मारहाण यावरून टोलप्लाझा सतत चर्चेत असतो. त्यात आज आणखी एक धक्कादायक प्रकार यतिन कदम यांनी उजेडात आणला. सध्या या टोल वसुलीचे कंत्राट स्कायलार्क कंपनीकडे असून वाण टेक्नॉलॉजी कंपनीचे सॅाफ्टवेअर आहे. सोळापैकी २ व ४ क्रमांकाच्या लेनमध्ये स्कायलार्क कंपनीने खासगी सॅाफ्टवेअर बसविल्याची माहिती कदम यांना समजली. त्यावर गेल्या पंधरा दिवसापासून कदम यांनी स्टिंग करीत २ व ४ लेन व इतर लेनवरील पथकर वसुलीच्या पावत्या संकलित केल्या. त्यात २ व ४ लेन मधील पावत्या बनावट असल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे या पावत्यांतून मिळणारी रक्कम ही लूट असल्याचे स्पष्ट झाले. ही रक्कम परस्पर हडप केली जात असल्याची खात्री पटली. 

बनावट पावतीतून पथकर वसुलीच्या मुद्दयावर भाजपचे विधानसभा अध्यक्ष यतिन कदम यांनी पिंपळगाव टोलप्लाझा अक्षरशः दणाणून सोडला. सुमारे दीडशे बनावट पावत्या घेऊन त्यांनी पथकर वसुली ठेकेदार कंपनीचे व्यवस्थापक योगेश सिंग, वाण सॅाफ्टवेअर व महामार्ग प्राधिकरणाचे तंत्रज्ञ प्रमुख दिलीप पाटील यांना वेगवेगळ्या पावत्या का दिल्या जातात याचा जाब विचारला. त्यावर संबंधितांची बोबडीच वळाली. आठ दिवसापूर्वी पत्र देऊनही याबाबत चौकशी का झाली नाही, अशी विचारणा कदम यांनी करताच दिलीप पाटील हे निरुत्तर झाले. चौकशी व कारवाईचे पत्र मिळेपर्यत टोलप्लाझाच्या कार्यालयातच कदम यांनी कार्यकर्त्यासह ठिय्या आंदोलन पुकारले. 

मग चौकशीचे पत्र का पाठविले ? 
पथकर वसुलीत अफरातफर नाही. दररोजचे ३२ लाख रुपये प्राधिकरणाकडे ठेकेदार कंपनी जमा करते असा युक्तिवादाचा प्रारंभ करणारे दिलीप पाटील यांनी नंतर घुमजाव केले. प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी बी. एस. साळुखे यांनी पिंपळगाव टोलप्लाझावर होत असलेल्या वसुलीबाबत चौकशीचे पत्र वरिष्ठांना पाठविल्याचे स्पष्ट केले. अपहार नाही तर चौकशी होण्याचे पत्र का पाठविले यावर मात्र ते निरूत्तर झाले. चौकशी व कारवाईचे लेखी उत्तर मिळाल्यानंतर कदम यांनी ठिय्या आंदोलन स्थगित केले. यावेळी भाजपाचे सागर शेजवळ, युवराज शेळके, राहुल घोलप, ज्ञानेश्‍वर पगार, अनिल नवले, बापू चौधरी आदी उपस्थित होते. 
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com