महाविकास आघाडीला भगदाड पाडत भाजपच्या अमरिशभाईंचा विजय

विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार मतदारसंघात महाविकास आघाडीला भगदाड पाडत भाजपचे नेते, माजी शालेय शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल यांनी दणदणीत विजय मिळविला. निवडणुकीत महाविकास आघाडीची सरासरी २०० मते फुटली आहेत. त्यामुळे या निवडणुकीने आघाडीतील नेत्यांच्या डोळ्यात अंजन घातले आहे.
BJP's Amrish Patel Won Dhule Council By-Election
BJP's Amrish Patel Won Dhule Council By-Election

धुळे : विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार मतदारसंघात महाविकास आघाडीला भगदाड पाडत भाजपचे नेते, माजी शालेय शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल यांनी दणदणीत विजय मिळविला. निवडणुकीत महाविकास आघाडीची सरासरी २०० मते फुटली आहेत. त्यामुळे या निवडणुकीने आघाडीतील नेत्यांच्या डोळ्यात अंजन घातले आहे.

विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार मतदारसंघाची पोटनिवडणूक एक डिसेंबरला झाली. यात ४३७ पैकी ४३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज सकाळी आठपासून मतमोजणीस सुरवात झाली. त्यात भाजपचे नेते उमेदवार अमरिशभाई पटेल यांना ३३२, तर प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांना ९८ मते मिळाली. चार मते बाद झाली. अनुभवी अमरिशभाईंनी नवखे उमेदवार पाटील यांना अक्षरशः धुळ चारली.

यामुळे भाईंचा विजय 

धुळे- नंदुरबार मतदारसंघात भाजपचे १९९, कॉंग्रेसचे १५७, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३६, शिवसेनेचे २०, असे मिळून महाविकास आघाडीचे २१३, एमआयएमचे ९, समाजवादी पार्टीचे ४, बसप १, मनसे १, अपक्ष १० मतदार आहेत. महाविकास आघाडी कागदावर संख्याबळाने स्ट्रॉंग दिसत असली तरी त्याचा निकालावर प्रभाव दिसून आला नाही. भाजपने या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे भगदाड पाडले. ऐन विधानसभा निवडणुकीवेळी अमरीशभाई पटेल यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांनी काँग्रेस सदस्य आणि विधान परिषदेच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. 

या रिक्त जागेसाठी ही पोटनिवडणूक झाली. यात अमरीशभाई भाजपमध्ये आले तरी त्यांच्या काँग्रेस, राष्ट्रवादीमधील समर्थक सदस्यांनी व इतर पक्षीय  सदस्यांनी या निवडणुकीत आपल्या नेत्याप्रती मतदानातून निष्ठा प्रकट केली. त्यामुळे अमरीशभाईंचा विजय सुकर झाला.

फक्त 98 सदस्य पाठीशी

महाविकास आघाडीच्या पाठीशी धुळे - नंदुरबार मतदारसंघातील केवळ 98 सदस्य असल्याचे या निवडणुकीतून अधोरेखित झाले आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com