धक्कादायक : भाजप नगरसेवकाची महिला तलाठ्यास मारहाण 

भाजप नगरसेवक गौरव चौधरी यांचा वाळूचा ट्रक तलाठी निशा पावरा यांनी थांबवला. तेव्हा ट्रक चालकाने ट्रक न थांबवता दोन तास फिरवला. तलाठ्यांनी पाठलाग करीत तो अडवला. तेव्हा भाजप नगरसेवक चौधरी यांनी या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालीत महिला तलाठ्यास मारहाण केली. त्याचा व्हीडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली.
 BJP corporator .jpg
BJP corporator .jpg

नंदुरबार : भाजप नगरसेवक गौरव चौधरी (BJP Corporator Gaurav Choudhary) यांचा वाळूचा ट्रक (Sand truck stopped for inquiry by Nisha Pawra) तलाठी निशा पावरा यांनी थांबवला. तेव्हा ट्रक चालकाने ट्रक न थांबवता दोन तास फिरवला. तलाठ्यांनी पाठलाग करीत तो अडवला. तेव्हा भाजप नगरसेवक चौधरी यांनी या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालीत महिला तलाठ्यास मारहाण केली. (Bjp leader beaten women employee) त्याचा व्हीडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. 

याबाबत भाजप नगरसेवकांसह तिघावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान तलाठी संघटनेने त्याचा निषेध करीत काम बंद आंदोलन केले. आदिवासी संघटनांकडून नगरसेवकांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

नंदुरबारच्या सीमेलगत गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणावर वाळूची वाहतूक रात्रंदिवस सुरू आहे. अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी नंदुरबार तहसील कार्यालयाकडून पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. नंदुरबार तहसील कार्यालयातील वाळू तपासणी पथकातील वैंदाणे येथील महिला तलाठी रूपाली डोंगरदिवे, खामगाव येथील तलाठी व्ही. पी. काकुळदे, पर्यवेक्षाधिन सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रशांत लोखंडे यांच्यासह महिला तलाठी निशा पावरा या शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास वाहनांची तपासणी करत होते.

या वेळी वाळू वाहतूक करणारे डंपर (एमएच ३९, एडी ०९६६) आले असता चालकास पथकातील कर्मचाऱ्यांनी रॉयल्टीबाबत विचारणा केली. त्या वेळी त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. मात्र रॉयल्टी पास दाखविली. चालकास पथकातील कर्मचाऱ्यांनी दहा टक्के खनिज विकास निधी पासची विचारणा केली असता, त्याच्याकडे ती आढळून आली नाही. यावेळी डंपरचालकास वाहन तहसील कार्यालयात जमा करण्यास सांगितले असता, त्याने मालक येत असल्याचे सांगून वाहन सोडून पसार झाला.

सुमारे दीड तासापर्यंत कोणीही आले नाही. दरम्यान, पथकातील कर्मचाऱ्यांनी दोन डंपर व एक ट्रक, असे तीन वाहन नंदुरबार तहसील कार्यालयात जमा केली. अकराच्या सुमारास घटनास्थळी डंपरमालक गौरव चौधरी, डंपर चालक व आणखी काही जण आले. यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांनी संबंधितांना वाहन तहसील कार्यालयात जमा करण्यास सांगितले. यावेळी पथकातील कर्मचारी व नगरसेवक गौरव चौधरी यांच्यात वाद निर्माण झाला.

दरम्यान, चालकाने डंपर करण चौफुलीकडे नेत असताना पथकातील कर्मचाऱ्यांनी शासकीय वाहनाने त्याचा पाठलाग करून उड्डाणपुलाशेजारील मिरची पथारीवर डंपर अडविले. यावेळी महिला तलाठी निशा पावरा व नगरसेवक गौरव चौधरी यांच्यात वाद निर्माण झाला. घटनास्थळी गौरव चौधरी यांनी निशा पावरा यांना धक्काबुक्की करून अश्लील, जातिवाचक शिवीगाळ करीत कानशीलात मारली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

या फिर्यादीवरून संशयित गौरव चौधरी, डंपरवरील चालक व अन्य वाहनावरील चालक अशा तिघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अ. प्र. कायदा कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी प्रभारी पोलिस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक निरीक्षक दिगंबर शिंपी, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, गणेश सूर्यवंशी यांनी भेट दिली आहे. उपविभागीय अधिकारी सचिन हिरे तपास करीत आहेत. दरम्यान, डंपरचालक व वाहनास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

भाजप नेते ट्रोल

याबाबतची व्हीडीओ क्लीप सोशल मीडियवर व्हायरल झाली. त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रीयांचा पाऊस पाडला. त्यात भाजप तसेच भाजप नेत्यांना प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com