तिजोरीच्या चाव्यांसाठी भाजपने दिले आठ नवे कारभारी!

उच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार भाजपचा एक सदस्य कमी करताना पुन्हा तांत्रिक अडचण निर्माण होवू नये म्हणून कायदेशीर सल्ल्यानुसार भाजपने स्थायी समितीवर सर्वचं आठ सदस्यांची नियुक्ती करताना शिवसेना, मनसे, कॉंग्रेस व राष्ट्रवाद कॉंग्रेस या सर्वचं पक्षांच्या सदस्यांची नव्याने घोषणा केली.
BJP Standing
BJP Standing

नाशिक : उच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार भाजपचा एक सदस्य कमी करताना पुन्हा तांत्रिक अडचण निर्माण होवू नये म्हणून कायदेशीर सल्ल्यानुसार भाजपने स्थायी समितीवर सर्वचं आठ सदस्यांची नियुक्ती करताना शिवसेना, मनसे, कॉंग्रेस व राष्ट्रवाद कॉंग्रेस या सर्वचं पक्षांच्या सदस्यांची नव्याने घोषणा केली.

माजी महापौर रंजना भानसी, स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आहेर-आडके या जुन्या जाणत्यांचा समितीत समावेश करताना मुकेश शहाणे यांना सामावून घेतल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात असले तरी फाटाफुट होवू नये याची काळजी घेण्यात आली.

स्थायी समिती सदस्यांच्या निवृत्त आठ सदस्यांच्या नियुक्तीसाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी ऑनलाईन सभा बोलाविली होती. गेल्या वर्षी तौलनिक संख्याबळानुसार नियुक्ती न झाल्याने शिवसेनेने न्यायालयातून आक्षेप घेतला होता. न्यायालयाने शिवसेनेच्या बाजूने निकाल देताना भाजपचा एक सदस्य कमी करून त्याएवजी शिवसेनेचा एक सदस्य वाढविण्याचा निकाल दिला होता त्यानुसार आज महापौरांनी स्थायी समिती सदस्यांची नावे घोषित केली. त्यापुर्वी भविष्यात पुन्हा अडचण निर्माण होवू नये यासाठी कायदेशीर सल्ला घेण्यात आल्यानंतर सर्वंच सोळा सदस्यांची नव्याने नावे घोषित करण्यात आली. माजी महापौर रंजना भानसी, स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आहेर-आडके, विद्यमान सभापती गणेश गिते यांना पुन्हा संधी देण्यात आली तर मुकेश शहाणे पहिल्या वर्षी सदस्य असताना त्यांना शेवटच्या वर्षात पुन्हा स्थायी समिती देण्यात आल्याने भाजप मधून आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

निवडणुकीचे शेवटचे वर्ष असल्याने त्यात स्थायी समितीत समसमान पक्षीय बलाबल झाल्याने दगाफटका होवू नये म्हणून नियुक्त्या करण्यात आल्याचे बोलले जात असले तरी इतरांवर अविश्‍वास दाखविण्यात आल्याचा नाराजीचा सुर व्यक्त होत आहे. स्थायी समिती सभापती पदाची निवडणुक झाल्यानंतर काही सदस्यांचे राजीनामे घेवून त्यांच्या जागेवर इतरांना संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात असून त्यात नाशिकरोडचे अंबादास पगारे यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे समजते.

असे आहेत नवीन सदस्य
भाजप : रंजना भानसी, हिमगौरी आहेर-आडके, गणेश गिते, मुकशे शहाणे, माधुरी बोलकर, प्रतिभा पवार, योगेश हिरे, इंदुमती नागरे. शिवसेना : सुधाकर बडगुजर, सत्यभामा गाडेकर, ज्योती खोले, रत्नमाला राणे, केशव पोरजे. अन्य सदस्य : सलीम शेख (मनसे), समिना मेमन (राष्ट्रवादी कॉंग्रेस), राहुल दिवे (कॉंग्रेस).
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com