नाशिकच्या २२ भाजप नगरसेवकांचा पत्ता कट?

विद्यमान नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी देण्याचा प्रघात आहे. परंतु, पाच वर्षातील कामगिरीचा विचार करून उमेदवारी दिली जाणार आहे. यामध्ये २२ नगरसेवक पक्षाच्या हिटलिस्टवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
BJP NMC
BJP NMC

नाशिक : सात महिन्यानंतर होणाऱ्या महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राजकीय पक्षाकडून (Political parties start prepration for NMC Election) आतापासूनच तयारी सुरु आहे. त्याचा भाग म्हणून भाजपकडून उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे. (BJP start survey of own corporators performans)  विद्यमान नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी देण्याचा प्रघात आहे. परंतु, पाच वर्षातील कामगिरीचा विचार करून उमेदवारी दिली जाणार आहे. यामध्ये २२ नगरसेवक पक्षाच्या हिटलिस्टवर (BJP`s 22 Corporator found doubtfull) असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महापालिकेच्या २०१७ च्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भाजपचे ६६ नगरसेवक निवडून आले. पालिकेच्या इतिहासात प्रथमच बहुमताचा आकडा पार झाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले गेले. बहुमत मिळूनही गेल्या ५३ महिन्यात, मात्र समाधानकारक अशी कामगिरी भाजपला करता आली नाही. त्यामुळे येत्या सात महिन्यात विविध विकासकामांचा बार उडविण्याची तयारी पक्षाकडून सुरु आहे. एकीकडे मतदारांना विविध विकासकामे दाखविताना दुसरीकडे पक्षांतर्गत डागडुजीला सुरवात झाली आहे. भाजपच्या ६६ नगरसेवकांपैकी एका नगरसेवकाचे निधन झाले. नगरसेविका सरोज आहिरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर पोट निवडणूक झाली. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जगदीश पवार निवडून आले. 

गेले काही दिवस भाजपच्या सुमार कामगिरीवर सातत्याने टिका होत आहे. त्याबाबत भाजपचे स्थानिक नेतेही नाराज आहेत. त्याचा परिणाम म्हणूनच माजी महापौर व माजी आमदार वंसत गिते, सुनिल बागूल यांनी शिवसेनेत प्रेवश केला आहे. या दोन नेत्यांच्या प्रभावाखालील पाच ते सहा नगरसेवक भाजपपासून अंतर राखून आहेत. कोरोना काळात पक्षाकडून अपेक्षीत व नागरिकांचे समाधान होईल अशी कामे झालेली नाहीत. त्यामुळे सत्ता असूनही भाजपच्या नगरसेवकांत अस्वस्थता आहे. त्याची दखल पक्षाच्या वरिष्ठांना घ्यावी लागली. त्यातूनच नगरसेवकांच्या कामगिरीचा आढावा घेतला जात आहे. आता उर्वरित नगरसेवकांच्या कामांचे मूल्यमापन सुरु झाले आहे.

या बाबी तपासल्या...
पक्षीय कार्यक्रमात सहभागी न होणे, मतदारांवर प्रभावहीन ठरणे, विकासकामे करताना हात आखडता घेणे, महापालिका कामकाजात सहभागी न होणे, साडेचार वर्षात महासभेला उपस्थित न राहणे किंवा उपस्थित राहूनही विषय न मांडणे, वादग्रस्त भूमिका घेणे, झेरॉक्स नगरसेवक म्हणून कुटुंबातील अन्य सदस्य फिल्डवर पाठविणे, पक्षाची भूमिका मतदारांपर्यंत न पोहोचविणे, वरिष्ठांच्या बैठकीला हजर न राहणे, गुंडगिरी आदी बाबी तपासल्या जात आहे. यामध्ये २२ नगरसेवक असे आढळले की, त्यांच्या कामकाजात व वागणुकीमध्ये त्रुटी आढळल्या. निवडणुकीची तयारी करताना हे २२ नगरसेवक पक्षाच्या हिटलिस्टवर आहेत. त्यांचा निवडणुकीतून पत्ता कट होण्याची शक्यता आहे. 

सानप समर्थकांवर संकट
पक्षीय पातळीवर नगरसेवकांचे मूल्यमापन करताना जे २२ नगरसेवक हिटलिस्टवर आहेत. त्यातील आठ नगरसेवक असे आहेत, की त्यांनी २०१९ च्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्वाखाली पुकारलेल्या बंडात सहभाग घेतला होता. सध्या सानप भाजपमध्ये परतले असले तरी त्यांना आपल्या समर्थक नगरेसवकांना कितपत संरक्षण देता येईल हा प्रश्नच आहे. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com