बच्चू कडूंनी पाठींबा दिलेला विवाह झाला, सोहळा मात्र रद्द!

दोन्ही कुटुंबांच्या सहमतीने येथे होऊ घातलेला आंतरधर्मीय विवाहाचा सोहळा हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधामुळे रद्द करण्यात आला. या विवाहाला राज्यमंत्री बच्चू कडू यांसह विविध संघटनांनी पाठींबा दिला होता. बच्चू कडू या विवाहात नाचणार होते. मात्र आता कडू यांचे सोहळ्यात नाचण्याचे स्वप्न अधुरे राहिले.
Bacchu Kadu
Bacchu Kadu

  
नाशिक : दोन्ही कुटुंबांच्या सहमतीने येथे होऊ घातलेला आंतरधर्मीय विवाहाचा सोहळा (Both Family supported inter religion marriage ceremoney cancel by organiser) हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधामुळे रद्द करण्यात आला. (Hindutwawadi organisation apposed thi ceremoney) या विवाहाला राज्यमंत्री बच्चू कडू यांसह विविध संघटनांनी पाठींबा दिला होता. बच्चू कडू (Bacchu Kadu) या विवाहात नाचणार होते. मात्र आता कडू यांचे सोहळ्यात नाचण्याचे स्वप्न अधुरे राहिले.

धार्मिक सलोख्याचे उदाहरण असलेला हा हिंदू - मुस्लीम विवाह यापूर्वीच नोंदणी पद्धतीने झाला आहे. त्याचा स्वागत समारंभ होणार होता. त्याच्या निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर त्यावरून काही हिंदूत्ववादी संघटनांनी त्याला लव्ह जिहादचे स्वरूप दिल्याने वाद झाला. वस्तुतः संबंधीत युवती दिव्यांग आहे. दोन्ही कुटुंबात स्नेहाचे संबंध आहेत. त्यांच्या परस्पर सहमतीने हा विवाह झाला होता. मात्र राज्याचे लक्ष वेधून घेतलेला व आज येथे होणारा नियोजित हिंदू- मुस्लिम धर्मातील विवाह सोहळा अखेर रद्द झाल्याने या वादावर पडदा पडला आहे. 

आठवडाभरापासून नाशिक शहरात होणारा तो हिंदू व मुस्लिम धर्मातील विवाह सोहळा चांगलाच चर्चेत राहिला. सुरवातीला सोशल मीडियावर आलेली ती लग्नपत्रिका बघून अनेकांनी या विवाह सोहळ्याला विरोध दर्शविला होता. त्यानुसार समाजातील काही संघटनांनी संबंधित मुलीच्या हिंदू परिवारातील पालकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार पालकांनी देखील हा विवाह सोहळा रद्द करण्यात येत आहे अशा प्रकारचे पत्र दिले होते.

त्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संबंधित परिवाराची भेट घेत हा विवाह सोहळा कसा होत नाही ते बघतो. एवढेच नव्हे तर या विवाह सोहळ्याला हजेरी लावून नाचतो देखील असे आव्हानात्मक वक्तव्य केले होते. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच चिघळले होते. 

श्री. कडू यांच्या विरोधात अनेक संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानुसार ठरलेल्या तारखेला विवाह होतो का ? आणि झालाच तर त्याला विरोध तर होणार नाही ना ? अशा विविध प्रकारच्या शंकाकुशंका निर्माण झाल्या होत्या. आज (ता.१८) चांडक सर्कलवरील एका हॉटेलात ठरलेला हा विवाह सोहळा अखेर रद्द झाल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला. यासंदर्भात मुलीच्या पालकांशी बोलणे केले असता त्यांनी समाजाला दिलेले पत्र व शब्द पाळला असून त्यामुळेच हा विवाह सोहळा रद्द करण्यात आल्याचे सकाळला सांगितले. पालकांनी दाखवलेल्या सामंजस्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त होत आहे. 
....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com