रुग्णालयांवर हल्ले हा भाजपच्या विकासाचा नवा पॅटर्न?

नाशिक आणि पुणे या दोन्ही शहरात कोरोनाचा प्रसार वेगाने झाला. विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणी भाजप सत्तेत आहे. येथे रुग्णांना सुविधा, उपचारांत मोठा हलगर्जीपणा झाल्याच्या तक्रारी आहेत. त्यात सुधारणा करण्याऐवजी भाजपच्या नेते, कार्यकर्त्यांनी रुग्णालयांवरच हल्ले केले. सत्ता राबवून व्यवस्था बदलण्याऐवजी थेट हल्ले करण्याचे प्रकार येथे घडले. भाजप हा नवा पॅटर्न तर आणू पहात नाही ना? अशी चर्चा आहे.
Bytco
Bytco

नाशिक : नाशिक आणि पुणे या दोन्ही शहरात कोरोनाचा प्रसार वेगाने झाला. विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणी भाजप सत्तेत आहे. (corona spread in Nashik & Pune city where BJP in Power)  येथे रुग्णांना सुविधा, उपचारांत मोठा हलगर्जीपणा झाल्याच्या तक्रारी आहेत. त्यात सुधारणा करण्याऐवजी भाजपच्या नेते, कार्यकर्त्यांनी रुग्णालयांवरच हल्ले केले. (BJP Workers attack on Hospitals) सत्ता राबवून व्यवस्था बदलण्याऐवजी थेट हल्ले करण्याचे प्रकार येथे घडले. भाजप हा नवा पॅटर्न (Is This new Devolopment patturn ob BJP) तर आणू पहात नाही ना? अशी चर्चा आहे. 

या प्रकरणाची स्वतःहून दखल घेत, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यासंदर्भात कारवाईच्या सूचना केल्या आहेत. यासंदर्भात त्यांनी काढलेल्या पत्रकात एक उल्लेख आहे. `पुणे असो वा नाशिक येथील महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्षाकडून आरोग्य यंत्रणेवर दबाब निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या पक्षातील जेष्ठ नेत्यांनी तेथील महापौर आणि लोकप्रतिनिधी यांना पत्र पाठवून समज दिली पाहिजे.`

महापालिकेच्या बिटको कोव्हिडं सेंटर मध्ये मोटार घुसवून तोडफोड केल्याने भाजप नगरसेविका सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र ताजणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते फरारी आहेत. यासंदर्भात त्यांनी एक व्हीडीओ व्हायरल केला आहे. त्यात त्यांनी या घटनेची जबाबदारी स्विकारली आहे. या रुग्णालयाच्या कामकाजाविषयी सनदशीर मार्गाने प्रशासनाकडे अनेक तक्रारी केल्या. मात्र कोणीही ज्यांच्याकडे तक्रारी करायचे ते देखील त्यात सहभागी असल्याने काहीच कार्यवाही होत नव्हती. त्यामुळे नाईलाज झाला. लोकांचे प्रश्न, तक्रारी सोडवणार कशा? त्यामुळे मला हा प्रकार करावा लागला. ही माझी प्रतिक्रीया होती. मात्र अशा अनेकांच्या प्रतिक्रीया भविष्यात उमटतील, असे म्हटले आहे. 

या सर्व घटनाक्रम व कार्यवाहीत मुळ प्रश्न दुर्लक्षीत राहण्याची भिती आहे. येथे रुग्णांना औषधोपचार व सुविधा नाहीत. नागरिकांनी बाहेरून औषधे आणावी लागतात. अनेक रुग्णांना जीव वाचविण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागते. अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. त्या रुग्णांची व्यवस्था सुरळीत झाली का?. याकडे दुर्लक्ष होतो कामा नये. त्याबाबत प्रशासनाला जागरूक व्हावे लागेल. अन्य नगरसेवक, भाजपचे नेते, नगरसेवक यांना ताजणे यांचा मार्ग पटला नसले तर त्यांनी सनदशीर मार्गाने हा शहराचा ज्वलंत प्रश्न सोडवावा. अन्यथा लोकांमधील नाराजी दुर होणार नाही. ती कधी दुर होते याचीच प्रतिक्षा आहे.

कोरोना रुग्णांची परवड
बिटको रुग्णालय सतत चर्चेत आहे कारण तेथे शहरातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक संपर्कात आहेत. परिसरातील अडतीस गावांचे नागरिक येथे उपचारासाठी दाखल होतात. त्याचे कारण म्हणजे शहरातील अन्य खाजगी तसेच शासकीय रुग्णालयांत या रुग्णांना दाद मिळत नाही.

या रुग्णांचा ओढा आपोआप महापालिकेच्या बिटको रुग्णालयाकडे होतो. जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे सर्व यंत्रणा मनुष्यबळ, तज्ञ डॅाक्टर्स आहेत. या रुग्णालयात सध्या कोरोनाचे निमित्त सांगून अन्य रुग्णांना दाकळ केले जात नाही. मात्र वास्तव हे की, येथे कोरोना रुग्णांची क्षमात फक्त दोनशे आहे. महापालिकेच्या बिटको रुग्णालयाची क्षमता सातशे आहे. या संकटाच्या काळात जिल्हा आरोग्य यंत्रणेने एकतर जिल्हा रुग्णालयाची कोरोना कक्षाची क्षमता वाढवावी किंवा बिटको रुग्णालयाची अडचण ओळखून मनुष्यबळ पुरवावे. मात्र हे सर्व महपालिका पदाधिकारी व जिल्हा यंत्रणा यांच्यात समन्वय लागेल. त्याचीच उणीव आहे.  त्यामुळे प्रशासनाने आता तरी याबाबत गांभिर्याने नियोजन करून व्यवस्था केलेली बरी.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com