नाशिकमध्ये चक्क अशोका हॅास्पिटलकडूनच साठेबाजी? - Ashoka medicover hospital stored 1000 remdacivier Inj, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

नाशिकमध्ये चक्क अशोका हॅास्पिटलकडूनच साठेबाजी?

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 एप्रिल 2021

शहर व जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनची कमतरता जावत आहे. त्यासाठी रुग्णांचे नातेवाईक हवालदील तर प्रशासन दिवसरात्र पाठपुरावा करीत आहे. मात्र अशा स्थितीत येथील अशोका मेडिकव्हर या रुग्णालयानेच तब्बल एक हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळवून त्याचा साठा केल्याचे उघडकीस आले आहे.

नाशिक : शहर व जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनची कमतरता जावत आहे. त्यासाठी रुग्णांचे नातेवाईक हवालदील तर प्रशासन दिवसरात्र पाठपुरावा करीत आहे. मात्र अशा स्थितीत येथील अशोका मेडिकव्हर या रुग्णालयानेच तब्बल एक हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळवून त्याचा साठा केल्याचे उघडकीस आले आहे. या रुग्णालयावर कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहे. 

गेले काही दिवस या इंजेक्शनच्या पुरवठयाबाबत अनेक तक्रारी येत होत्या. त्याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी देखील दोन दिवसांपूर्वी पुरवठा व गरज यात तफावत असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आज पालकमंत्र्यांच्या चौकशीत त्यांना काही गैरप्रकार निर्दशनास आले. त्यानंतर अशोका मेडिकव्हर या प्रतिष्ठीत रुग्णालयानेच कोरोनाच्या आणिबाणीच्या स्थितीचा गैरफायदा घेतल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली. 

या प्रकारानंतर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी त्याची माहिती दिली. ते म्हणाले,  औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० व नियम १९४५ मधील शेड्यूल के प्रमाणे हॉस्पिटलला थेट उत्पादकांकडून औषध खरेदी करण्याची मुभा अन्न व औषध प्रशासनाने दिलेली आहे. त्या तरतुदीनुसार नाशिक मधील अशोका हॉस्पिटल ने थेट उत्पादकाकडून  खरेदी केली असल्याचे दिसून आले आहे.

खरेदीची मुभा जरी दिली असली, तरीसुद्धा सद्यस्थितीत रेमडेसिव्हिरचा निर्माण झालेला तुटवडा विचारात घेता रुग्ण संख्येपेक्षा अव्यावहारिकरित्या जास्तीचा साठा थेट उत्पादकाकडून प्राप्त करून घेणेसुद्धा अभिप्रेत नाही. त्या अतिरिक्त साठ्या संदर्भात आपत्कालीन परिस्थिती विचारात घेता आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांना लिखित स्वरूपात आज दिल्या आहेत. 

त्याचबरोबर उत्पादक कंपनीशी सुद्धा संपर्क करून त्यांनी कोणत्याही हॉस्पिटलना यापुढे अवाजवी पुरवठा करु नये, अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत. जेणेकरून केंद्रीय पद्धतीने वाटपासाठी अधिक कोटा जिल्ह्याला उपलब्ध राहील. नाशिक जिल्ह्यात आपण थेट हॉस्पिटलला कोटा वाटप करण्याची सुरू केलेली कार्यपद्धती परिणामकारक ठरत आहे. त्यामुळे उपलब्धतेच्या प्रमाणात, अत्यवस्थ रुग्णांना औषध पोहोचवणे आपल्याला शक्य होऊ लागले आहे. या संपूर्ण कार्यवाहीचे  जिल्हाधिकारी कार्यालयातील केंद्रीय कंट्रोल रूम द्वारे संपूर्ण नियंत्रण केले जाणार आहे.
....

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख