शेतकऱ्यांचाही विचार करा, बाजार समित्या सुरु ठेवा - APMC Shold exempt form strict Lockdown, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

शेतकऱ्यांचाही विचार करा, बाजार समित्या सुरु ठेवा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 मे 2021

बाजार समिती बंदमुळे शेतकरी चिंतेत असून, शेतमालाची विल्हेवाट कशी लावावी, असा प्रश्‍न त्यांना पडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन कडक https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nashik/acive-covid19-patients-figure-down-nahsik-nashik-politics-75916लॅाकडाउनमधून बाजार समित्यांना वगळावे अशी मागणी होत आहे.

नाशिक : बाजार समिती बंदमुळे शेतकरी चिंतेत असून, शेतमालाची विल्हेवाट कशी लावावी, असा प्रश्‍न त्यांना पडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन कडक  लॅाकडाउनमधून बाजार समित्यांना वगळावे अशी मागणी होत आहे. यासंदर्भात नाशिक समितीचे सभापती पिंगळे यांनी पुढाकार घेतल्याने आज होणाऱ्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कडक निर्बंधांच्या काळात शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी जिल्ह्यातील बाजार समित्या सुरू ठेवण्याबाबत नाशिक बाजार समितीचे सभापती व जिल्हा उपनिबंधक यांची बैठक होणार आहे. या बैठकीत शासकीय नियमांचे पालन करीत बाजार समित्या सुरू ठेवण्याबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, या संदर्भात बुधवारी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याशी आपण चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात एकूण १६ बाजार समित्या असून, प्रत्येक ठिकाणी विविध प्रकारचा शेतमाल मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येत असतो. जिल्ह्यासह राज्याच्या बाहेरही शेतमाल पाठविला जातो. यातून रोज कोट्यवधींची उलाढाल होत असते. मात्र, सध्या जिल्ह्यात २३ मेपर्यंत निर्बंध अधिक कडक केलेले असल्याने बाजार समित्याही बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान या काळात होण्याची शक्यता आहे. अशा पार्श्‍वभूमीवर आपण स्वतः जबाबदारी स्वीकारत शासकीय नियमांचे पालन करीत बाजार समिती सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी मांढरे यांच्याशी चर्चा केली असून, त्यांच्या सूचनेनुसार गुरुवारी सकाळी अकराला जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्याशी बैठकीत चर्चा करणार असल्याचे श्री. पिंगळे यांनी सांगितले.

दिवसाआड लिलाव करा
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर २३ मेपर्यंत लॉकडाऊनचे कडक निर्बंध लागू करत जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. त्यावर उपाय म्हणून बाजार समित्यांमधील लिलाव एक दिवसाआड आणि तेही एका सत्रात सुरु ठेवण्यात यावेत. 

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. कांदा हे हंगामी पीक असून अवर्षण प्रवणग्रस्त तालुक्यांमध्ये कांदा हेच प्रमुख नगदी पीक असल्याने आणि खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी खते बी-बियाणे, शेतीची पूर्वमशागत यासाठी कांदा उत्पादकांना कांदा विक्रीतून पैसे उपलब्ध होणार आहेत. तसेच कांदा उत्पादकांच्या कुटुंबातील कोणी खासगी दवाखान्यात उपचार घेत असल्यास औषधे व दवाखान्याच्या बिलासाठी कांदा विक्रीतून पैसे उभे करणे शेतकऱ्यांसाठी जरुरीचे आहे.
...
हेही वाचा...

नाशिकला सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्येत मोठी घट

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख