अनिल बोंडेंनी स्वतःचीच लायकी दाखवली !

देशासाठी अहोरात्र ड्युटी करणारा पोलिस सदैव कर्तव्यासाठी सक्रीय असतो. अशा पोलिसांनी भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मंत्री अनिल बोंडे यांनी पोलिसांना अपशब्द वापरले. त्यांना कुत्रे म्हटले. त्याच्या तीव्र प्रतिक्रीया उमटल्या आहेत.
Raosaheb Pote
Raosaheb Pote

नाशिक : देशासाठी अहोरात्र ड्युटी करणारा पोलिस सदैव कर्तव्यासाठी सक्रीय असतो. अशा पोलिसांनी भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मंत्री अनिल बोंडे यांनी पोलिसांना अपशब्द वापरले. त्यांना कुत्रे म्हटले. त्याच्या तीव्र प्रतिक्रीया उमटल्या आहेत.

यातून बोंडे यांनी आपली लायकी व खानदानाचे संस्कार काय आहेत, हेच दाखवून दिले आहे, अशी प्रतिक्रीया निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त रावसाहेब पोटे यांनी सांगितले. 

नाशिक जिल्हा निवृत्त पोलिस अधिकारी व अंमलदार प्रतिष्ठानतर्फे भाजपचे नेते बोंडे यांचा तीव्र शब्दात निषेध केला. बोंडे यांनी तातडीने माफी मागावी. ते ज्या पक्षाचे प्रतिनिधीत्व करतात, तो भाजप स्वतःला पार्टी वीथ डिफरन्स म्हणवतो. हेच काय त्यांचे वेगळेपण?. श्री. बोंडे यांनी पोलिसांविषयी केलेले वक्तव्य त्यांना मान्य आहे काय? असा प्रश्न त्यांनी केला.

ते म्हणाले, माजी मंत्री अनिल बोंडे यांनी पोलिस कुत्रे आहेत असे म्हणून समस्त पोलिस अधिकारी, अंमलदार, त्यांचे पालक व कुटुंबियांचा अपमान केला आहे. त्यांनी आपल्या वक्तव्यातून स्वतःची लायकी दाखविली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा निवृत्त पोलिस अधिकारी व अंमलदार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने निषेध करण्यात येत आहे.  

श्री. पोटे म्हणाले, स्वातंत्र्य मिळाल्यापासून शेकडो पोलिस दहशतवादी हल्ले, कर्तव्य बजावताना, गुन्हेगारी व अपप्रवृत्तीशी सामना करतांना शहीद झाले आहेत. हेच पोलिस दिवसरात्र आपली ड्युटी बजावत असतात. देशात सर्व कारखाने, संस्था, शासनाचे विविध विभागांत कर्मचारी आठ तास काम करतो. तासभर जरी त्यापेक्षा अधिक काम केले तर त्यांना दोन तासांचा ओव्हरटाईम मिळतो. पोलिस मात्र चोविस तास बांधील असतात. कोणतिही आपत्ती असो वा कायदा सुव्यवस्था त्यांनाच ते हाताळावे लागते. अशा पोलिसांविषयी सबंध व्यवस्था कृतज्ञता व्यक्त करत असते. मात्र बोंडे सारखी समाजाला लागलेली कीड पोलिसांविषयी अपशब्द वापरतात. त्याने आमच्या भावना तीव्र आहेत. मात्र आम्ही संयमाने याचा निषेध करतो. बोंडे यांनी ताबडतोब माफी मागावी.  प्रतिष्ठानचे पदाधिकारी निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त चंद्रकांत बनकर, सुरेश भामरे, निवृत्ती मेढे, अन्वर सय्यद, चित्रा थेटे, दिलीप डहाळे, विलास पाटील आदी पदाधिका-यांनीही नाराजी व्यक्त केली.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com