नागरिकांच्या संतापानंतर पोलिसांनी मध्यरात्री भावेंना सोडले!

रुग्णालयाला विमा कंपनीने पैसे अदा केल्यावर देखील रुग्णाचे डिपॅाझीट परत करण्यास नकार देणाऱ्या रुग्णालयाविरोधात आम आदमी पार्टीच्या जितेंद्र भावे यांनी अर्धनग्न होत आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मात्र त्यांच्या समर्थनार्थ पोलिस ठाण्याबाहेर एव्हढी गर्दी झाली की पोलिसांना त्यांना मुक्त करावे लागले.
Bhave 002
Bhave 002

नाशिक : रुग्णालयाला विमा  कंपनीने पैसे अदा केल्यावर देखील रुग्णाचे डिपॅाझीट परत करण्यास नकार (Insurance compony paid the bill then also hospital rfuge to repay patients Deposit) देणाऱ्या रुग्णालयाविरोधात आम आदमी पार्टीच्या जितेंद्र भावे यांनी अर्धनग्न होत आंदोलन केले. (Patients son agiatate with Uncloath) त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मात्र त्यांच्या समर्थनार्थ पोलिस ठाण्याबाहेर एव्हढी गर्दी (Jitendra Bhave Supporter crowd)  झाली की पोलिसांना त्यांना मुक्त करावे लागले. 

दरम्यान श्री. भावे यांना पाठींबा म्हणून `मी पण सोबत आहे` हा हॅशटॅग एव्हढा व्हायरल झाला की, अनेकांनी त्यांना पाठींबा देत रुग्णालयांकडून कोरोनाग्रस्त व त्यांच्या नातेवाईकांवरील जाच  या घटनांचा पाऊस पाडला. यावेळी मुंबई नाका पोलिस ठाण्याबाहेर हजारो नागरिक जमले. रुग्ण दगावलेल्या महिलेने, `माझी आई गेली. रुग्णालयाने प्रचंड बील आकारले. पैसे दिल्यावरही अनामत रक्कमेचे पैसे देत नाहीत. रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार होत होता. तेव्हा कुठे गेले होते पोलिस` असा प्रश्न केला. मध्यरात्री बारापर्यंत पोलिस या प्रकरणात काय कारवाई करावी या गोंधळात होते. नागरिकांचा दबाव वाढत होता. रुग्णालयानेही परिस्थिती लक्षात घेऊन कोणतिही तक्रार देण्यास नकार दिला. त्यामुळे मध्यरात्री, जितेंद्र भावे यांना सोडून दिले.

यासंदर्भात माहिती अशी, शहरातील व्यवसायिक खाजगी दवाखान्यात कोरोना रुग्णांना आकारल्या जाणाऱ्या अवाजवी बिलांविरोधात आम आदमी पक्षाचे जितेंद्र भावे यांनी काल अर्धनग्न होत आंदोलन केले होते. त्याबाबत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याचा मोबाईल ताब्यात घेऊन तो स्वीच ऑफ केला. ही बातमी समजल्यावर शेकडो नाशिककर नागरिक त्यांच्या समर्थनार्थ पोलीस ठाण्याच्या बाहेर जमले. श्री. भावे यांचा गुन्हा काय?. दवाखान्यात त्यांनी एका पेशंटचे घेतलेले दीड लाख डिपॉझिट परत करावे म्हणून आग्रह धरला. त्या रुग्णाच्या घरात आई, वडीलांसह चार मृत्यू झाले. त्यांनी दहा लाख रुपये बिल भरल्याचे बोलले जाते. तरीही दिड लाखांची अनामतपरत दिली जात नव्हती.

त्यामुळे आमचे कपडे विकून आता उर्वरीत बिल भागवा अशी टोकाची भूमिका त्यांनी घेतली. हे कितपत सभ्य, सुसंस्कृत अशी चर्चा ज्यांना करायची त्यांनी जरूर करावी. परंतु हा संताप कशातून येतो हे समजून घेतले पाहिजे, अशी भूमिका भावेंच्या समर्थनार्थ जमलेल्या नागिरकांनी व्यक्त केली. 

श्री. भावे वर्षभर सातत्याने नाशिकमधील दवाखान्याचे वास्तव फेसबुक लाईव्ह द्वारे मांडत आहेत. त्यांच्या फेसबुक पेजवर असे शेकडो लाईव्ह आपल्याला दिसतात. रुग्णालयात झोपून असलेल्या रुग्णाच्या जेवणाचे बिल लावणे, नऊ रुपयाचे ग्लोव्हज ६७ रुपयाला आणि अशा कितीतरी सुरस कथा त्यांनी पुढे आणल्या. या नाडलेल्या रुग्णालयांच्या अनेक तक्रारी, पोलिस तसेच व्यवस्थेकडे गेल्या. मात्र समाधानकारक काहीच उपाय झाला नाही. हे प्रकार थांबले नाही. कालच्या प्रकाराने त्याचे शीखर गाठले होते. आता रुग्णालये,  पोलिस व प्रशासन काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.  यासंदर्भात हेरंब कुलकर्णी यांनी मी पण सोबत आहे हा हॅशटॅग व्हायरल केला आहे.
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com