नोट प्रेसचे १०० खाटांचे कोविड रुग्णालय होणार - 100 bed covid19 centre in ISP Hospital, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

नोट प्रेसचे १०० खाटांचे कोविड रुग्णालय होणार

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 मे 2021

केंद्र सरकारच्या सीएनपी व इंडिया सिक्युरिटी प्रेसचे नेहरू नगर येथील रुग्णालयात शंभर खाटांचे कोविड सेंटर कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला. खासदार हेमंत गोडसे, खासदार भारती पवार, महापौर सतीश कुलकर्णी, आयुक्त कैलास जाधव यांनी संयुक्त पाहणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

नाशिक : केंद्र सरकारच्या सीएनपी व इंडिया सिक्युरिटी प्रेसचे नेहरू नगर येथील रुग्णालयात शंभर खाटांचे कोविड सेंटर कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला. खासदार हेमंत गोडसे, खासदार भारती पवार, महापौर सतीश कुलकर्णी, आयुक्त कैलास जाधव यांनी संयुक्त पाहणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

केंद्र सरकारच्या करन्सी नोट प्रेस व इंडिया सिक्युरिटी प्रेस ही दोन महत्त्वाची आस्थापने शहरात असून यात चाळीस हजार कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यांसाठी सरकारी सदनिकांबरोबरचं नेहरू नगर येथे रुग्णालय आहेत. एवढी मोठी उपलब्धी असताना रुग्णालयाचा उपयोग होत नाही. त्यामुळे तातडीने या रुग्णालयाचा वापर कोविड उपचारासाठी व्हावा, अशी मागणी डाव्या पक्षाच्या नेत्यांनी केली होती. त्याअनुशंगाने आयुक्तांच्या दालनात सोमवारी (ता.३) बैठक झाल्यानंतर संध्याकाळी रुग्णालयाची पाहणी करण्यात आली. रुग्णालयात पायाभूत सुविधा पुरविण्याचे आश्‍वासन आयुक्तांनी दिले तर केंद्र सरकारकडून मदत आणण्याची जबाबदारी दोन्ही खासदारांनी घेतली. रुग्णालयाच्या पाहणीत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नसल्याचे आढळून आले. त्यामुळे इमारतीची डागडुजी, रंगरंगोटी, स्वच्छता विषयक कामे महापालिकेच्या वतीने केली जाणार आहे. नवीन बिटको, झाकीर हुसेन, जिल्हा रुग्णालय, मविप्र रुग्णालया व्यतिरिक्त रुग्णांच्या सेवेसाठी केंद्र सरकारचे हॉस्पिटल तयार झाल्यास रुग्णांना जीवनदायी ठरणार असल्याचेही महापौर कुलकर्णी यांनी सांगितले.

तातडीने तयारीला लागा
कोरोनाची तिसरी लाट येणार असून ती लाट मोठया प्रमाणात घातक राहील असे सुतोवाच करण्यात आले आहे. शहरातील संभाव्य वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता पूर्वतयारी म्हणून आरोग्यसेवा सक्षमप्रकारे देण्याकरिता हॉस्पिटलकरिता आवश्यक असलेल्या दुरुस्त्या करून प्राथमिक सोयी-सुविधांसह सदरचे हॉस्पिटल कोविड म्हणून कार्यान्वित करण्यासाठी सूचना देण्यात आल्याचे महापौर कुलकर्णी यांनी सांगितले.

यावेळी आमदार सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, भाजप शहराध्यक्ष गिरीष पालवे, महापालिकेचे सभागृह नेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, माजी उपमहापौर ॲड. मनिष बस्ते, ॲड. तानाजी जायभावे, गुलाम शेख, गणेश उन्हवणे, प्रेस युनियनचे अध्यक्ष जगदीश गोडसे, राजू देसले, ज्ञानेश्‍वर जुंद्रे आदी यावेळी उपस्थित होते. 
....
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख