प्रकाश थविल यांची `स्मार्ट सिटी` मधून उचलबांगडी - Smart city CEO Prakash Thavil transfer to revenue department, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

प्रकाश थविल यांची `स्मार्ट सिटी` मधून उचलबांगडी

संपत देवगिरे
शुक्रवार, 2 जुलै 2021

`स्मार्ट सिटी`चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांच्या कार्यशैलीविषयी मोठ्या प्रामणात तक्रारी होत्या. त्यांची बदली झाली आहे. यापुढे आता `स्मार्ट सिटी`मध्ये जिल्हाधिकारी आणि विभागीय महसूल आयुक्तांचाही समावेष करण्यात आला आहे. राज्याचे प्रधान सचिव तसेच  स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत आज झालेल्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय झाले.

नाशिक : `स्मार्ट सिटी`चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल (Smart city CEO Prakash Thavil transfered to revenue department) यांच्या कार्यशैलीविषयी मोठ्या प्रामणात तक्रारी होत्या. त्यांची बदली झाली आहे. यापुढे आता `स्मार्ट सिटी`मध्ये जिल्हाधिकारी आणि विभागीय महसूल आयुक्तांचाही (Collector will be the coordinator of Smart city) समावेष करण्यात आला आहे. राज्याचे प्रधान सचिव तसेच  स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष सीताराम कुंटे (Sitaram kunte) यांच्या उपस्थितीत आज झालेल्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय झाले. 

श्री. थवील यांच्या जागेवर  सुमंत मोरे यांची नियुक्ती झाली आहे. थविल यांची प्रतिनियुक्ती तत्काळ रद्द केली असून त्यांची नेमणूक महसूल व वन विभागाकडे केली आहे.

गेले काही दिवस टिकेचा विषय ठरलेले नाशिक स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांची बदली करण्यात आली आहे.  त्यांची कार्यशैली सातत्याने टिकेचा विषय होती. यासंद्रभात झालेल्या विशेष महासभेत त्यांच्या हाकालपट्टीचा ठराव करण्यात आला. याबाबत महापौर सतीश कुलकर्णी यांनी थविल यांची तत्परतेने बदली करावी, असा ठराव मंगळवारी सर्वसाधारण सभेत मंजूर केला होता. 

मंगळवारी स्मार्ट सिटी संदर्भात झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत श्री. थविल उपस्थित नव्हते. स्मार्ट कामांबाबतच्या तक्रारी मांडल्यानंतर उत्तरे देणारे जबाबदार व्यक्ती नसल्याने लोकप्रतिनिधींकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. स्मार्टसिटी कंपनी ईस्ट इंडिया कंपनी असल्याचा उल्लेख करताना स्मार्टसिटीच्या नावाखाली शहर भकास केल्याचा आरोप नगरसेवकांनी केला होता. 
...
हेही वाचा...

व्वा माणिकराव, असा साधेपणा नाशिककरांनी पाहिली नव्हता!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख