कोरोनासाठी `मालेगाव पॅटर्न`ला `हैद्राबादी` औषधाचा कडक पर्याय !!

कोरोनाची चर्चा खुप होते आहे. त्याने नागरिकांना त्याची धास्ती वाटू लागली आहे. ही धास्ती काहींचा व्यापार होत असल्याची टिका होते आहे. यासंदर्भात गतवर्षी मालेगाव शहरात सामान्यांसाठी काढा परिणामकारक ठरला होता. यंदा नाशिकमध्ये हैद्राबादी औषध आले आहे. हे औषध देखील चर्चेचा विषय ठरले आहे.
Hyderabad pattern
Hyderabad pattern

नाशिक : कोरोनाची चर्चा खुप होते आहे. त्याने नागरिकांना त्याची धास्ती वाटू लागली आहे. ही धास्ती काहींचा व्यापार होत असल्याची टिका होते आहे. यासंदर्भात गतवर्षी मालेगाव शहरात सामान्यांसाठी काढा परिणामकारक ठरला होता. यंदा नाशिकमध्ये हैद्राबादी औषध आले आहे. हे औषध देखील चर्चेचा विषय ठरले आहे. 

मालेगाव येथील डॉक्टरांच्या उपचार पद्धती आणि काढ्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. कोरोनावर अतिशय गुणकारी उपचार पद्धती म्हणून मालेगाव पॅटर्नची सर्वदूर चर्चा झाली. शवेटच्या टप्प्यात तर नाशिक शहरात देखील युनानी पथीचे हे तज्ञ नागरिकांची मोफत तपासणी करीत हा काढा घेण्याचा सल्ला देत होते. अतिशय कमी खर्च व सामान्यांच्या आवाक्यात असल्याने सगळ्यांनीच त्याचे स्वागत केले होते. त्यामुळे या पॅटर्न विषयी अनेकांना उत्सुकता होती. 

यंदा मात्र हैदराबाद पॅटर्नची चर्चा जुने नाशिक परिसरात सुरु आहे. हैदराबाद येथील मोहमंद अकील अमहमद यांनी तयार केलेले हे औषध सध्या कोरोनाबाधित रुग्णांवर परिणामकारक ठरत असल्याचा त्यांच्या विक्रेत्याचा दावा आहे. त्याबाबत नेमकेपणाने माहिती उपलब्ध नाही. मात्र  सोमवारी मोहमंद अली यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यानी नाशिकच्या प्रसिद्ध बडी दर्गाला भेट दिली. यावेळी त्यांनी या औषधाची माहिती दिली. तसेच काही साठा बडी दर्गा संस्थेच्या विश्‍वस्तांना सुपुर्त केला.  विश्‍वस्तांकडून या औषधाचे मोफत वितरण केले जात आहे. 

`तिब-ए-नब्वी` असे या औषधाचे नाव आहे. ते आयुर्वेदीक औषध आहे. त्याचे कोणतेही दुष्परीणाम नसल्याचे त्यानी सांगीतले. आतापर्यंत हैदराबादसह तेलंगना राज्य, महाराष्ट्र  आणि परराज्यातील आठ लाख नागरिकानी त्याचा वापर केला आहे. शहरातही अनेक नागरिक व रुग्ण त्याचा वापर करीत आहे. सकाळी उपाशी पोटी दोन चमचे औषध घेतल्यावर दहा ते १५ मिनिटानी कोमट पाणी प्राशन करायचे. त्यानंतर आर्ध्या तासानंतर भोजन करायचे. दुपारी आणि रात्री जेवणानंतर आर्ध्या तासाने औषध घ्यायचे पत्थ्य आहे. त्याची सविस्तर माहिती उपस्थीत नागरीकाना त्यांनी दिली. कोरोना बांधीत रुग्णाने औषध घेतल्यास तीन ते चार दिवसात तो बरा होतो. बहुतांश रुग्ण बरे झाल्याचा दावा त्यानी केला आहे. सामाजिक बांधीलकी म्हणून औषधाचे निर्माण करुन मोफत वितरण केले जात असल्याची माहिती मोहमंद अकील यानी दिली. 

या औषधाची माहिती मिळाल्यावर बडी दर्गा संस्थेच्या विश्‍वस्तानी निर्मात्यांशी संपर्क साधला. त्याना नाशिकला येण्याचे निमंत्रण दिले. त्यानुसार औषध निर्मात्यांचे पथक सोमवारी बडी दर्गा येथे आले होते. त्यानंतर विश्‍वस्तानी त्या औषधाचे मोफत वितरण सुरु केले आहे. आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडू, सौदी अरब, दुबई येथे देखील औषध देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सध्या मर्यादीत साठा उपलब्ध आहे. त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळाल्यास आणखी औषध उफलब्ध केले जाणार आहे.

यावेळी हैदराबाद येथील अब्दुलमाजीद खान, तारीकअशरफ उर्मी, अकील देशमुख, रफिक सय्यद, अब्दुलमलिक चाऊस मुस्तफा इकबाल यांच्यासह बडी दर्गाचे विश्‍वस्त हसीब पिरजादे, अन्सार पिरजादे, माजीद पिरजादे यांच्यासह मुशीर पिरजादे, परवेज पिरजादे, खलील अहमेद, सादीक शेख, फारुख सय्यद आदी उपस्थीत होते.
....
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com