राज्यातील ४३८ पोलिस आधिकाऱ्यांना बढत्‍या

राज्य पोलीस दलातील विविध पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या अधिकारी पदोन्नीत करण्यात आले आहेत. राज्यातील ४३८ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना बढती देण्यात आली आहे. त्यात नाशिकच्या १६ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. संबधीतांची पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
Police pramotion
Police pramotion

नाशिक : राज्य पोलीस दलातील विविध पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या अधिकारी पदोन्नीत करण्यात आले आहेत. राज्यातील ४३८ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना बढती देण्यात आली आहे. त्यात नाशिकच्या १६ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. संबधीतांची पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षकांच्या बढत्या गेल्या पावणे दोन वर्षापासून रेंगाळल्या होत्या. गृहविभागाने या पदोन्नतीस हिरवा कंदील दाखविल्याने महिन्याच्या प्रारंभीच सेवाजेष्ठतेनुसार ६५० पेक्षा जास्त अधिकाऱ्यांबाबतची माहिती व संवर्ग पोलिस मुख्यालयाने मागविली होती. आस्थापना विभागाकडून त्याची छाननी करण्यात आल्यानंतर पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी बढत्यांचे आदेश काढले. आदेशात संबधीत अधिकाºयांना नवनियुक्तीसाठी त्वरीत कार्यमुक्त करण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. 

पदोन्नती झालेल्या पोलिस अधिका-यांना नव्या नेमणूका दिल्या जाणार आहेत. यामध्ये राज्यातील सर्व भागातीव व शहरांतली पोलिस अधिकारी आहेत. दिर्घकाळ प्रतिक्षा करावी लागल्याने या पोलिस अधिका-यांनी पदोन्नती झाल्याने आनंद व्यक्त केला आहे. 

नाशिक शहर आणि ग्रामिण दलातील अधिकाऱ्यांची नावे व नियुक्ती ठिकाण पुढील प्रमाणे, नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील द्वारका विश्वनाथ डोखे (एमपीए ), मनिषा बाळकृष्ण राऊत (एमपीए), नितीन जगन्नाथ कंडारे (मुंबई शहर) रमेश बाबा वळवी ( वि.सु.वि), मंगेश नंदकिशोर मजगर ( मुंबई शहर), मनोज सर्जेराव शिंदे (मुंबई शहर), नाशिक ग्रामीण पोलीस दलातील समिर सुरेश अहिरराव (मिरा भाईंदर वसई विरार) ,रणजित नारायण माने (पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर) सचिन मुरलीधर खैरणार (दहतशवाद विरोधी पथक), प्रविण वीरसिंग पाडवी (लोहमार्ग , मुंबई), मनोहर दौलतराव पगार ( मुंबई शहर), गणेश सुभाष गिरी  (विशेष सुरक्षा विभाग), स्वप्ना सिदाप्पा शहापूरकर ( मुंबई शहर), महेश यशवंत मांडवे (मुंबई शहर), किशोर सोमनाथ मानभाव (गडचिरोली), लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (हेमंतकुमार साहेबराव भामरे) यांचा समावेष आहे. 
....
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com