आमदार सुहास कांदे म्हणाले, गाडीला थांबा द्या अन्यथा रेल्वे रुळावर झोपेन ! - MLA Suhas Kande warns Railway adm for stoppages | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

आमदार सुहास कांदे म्हणाले, गाडीला थांबा द्या अन्यथा रेल्वे रुळावर झोपेन !

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 4 जानेवारी 2021

नांदगावचे रद्द केलेले रेल्वे गाड्यांचे थांबे तातडीने सुरु करावेत. रेल्वे प्रशासनाने नांदगावच्या नागरिकांचा अंत पाहू नये. अन्यथा त्यांची सहनशीलता संपुष्टात येईल. त्याची स्रवस्वी जबाबदारी प्रशासनाला घ्यावी लागेल असा इशारा शविसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी आज येथे दिला. 

नांदगाव : रद्द केलेले रेल्वे गाड्यांचे थांबे तातडीने सुरु करावेत. रेल्वे प्रशासनाने नांदगावच्या नागरिकांचा अंत पाहू नये. अन्यथा त्यांची सहनशीलता संपुष्टात येईल. त्याची स्रवस्वी जबाबदारी प्रशासनाला घ्यावी लागेल असा इशारा शविसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी आज येथे दिला. 

नांदगावच्या रेल्वे समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही नांदगावकर समितीततर्फे शहरात बंद पाळण्यात आला. सकाळी शहरातील गांधी चौक येथून नागरिकांनी मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व शविसेनेचे आमदार सुहास कांदे, संतोष गुप्ता, भाजपच्या अॅड जयश्रीताई दौड, सुमित सोनवणे, तुषार पांडे आदींनी केले. 

मोर्चाला उपस्थित राहण्यास विलंब झालेल्या खासदार डॉ भारतीताई पवार यांनी नंतर पत्रकार परिषदेत रेल्वे प्रश्नाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. नांदगाव स्थानकासाठी थांबे सुरु करण्यासाठी असलेल्या कोविड तपासणी विषयीच्या अडचणी आहेत. सध्या सुरु असलेल्या गाड्या विशेष रेल्वे प्रवासी गाड्या आहेत. त्यांचे वनियोजन प्रवासी संख्येचा निकषानुसार केले जाते. प्रशासनाने थांब्यासाठी किती प्रवासी असावेत हा निकष लावला. तरीही थांबे मिळावेत यासाठी माझा पाठपुरावा सुरु आहे. प्रशासनाकडून सकारात्मक उत्तराची अपेक्षा असल्याचे खासदार डॉ पवार यांनी सांगितले,

प्रवासी गाड्यांचे एका पाठोपाठ सात थांबे कोरोनामुळे बंद करण्यात आले आहे. तसेच अरूंद भुयारी पुल, बंद झालेले रेल्वेफाटक यामुळे त्रस्त झालेल्या शहरवासियांनी  मी नांदगावकर या झेंड्याकाली एकत्र येऊन, केलेल्या बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरात १०० टक्के बंद पाळण्यात आला. रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्याने नागरिकांची मन:स्थिती दुसऱ्या गावी राहायला जाण्याची झाली आहे. गाड्या थांबविण्याचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीतला नसून ती जबाबदारी केंद्राची आहे. अन्याय होणार असेल तर मी नांदगावकर म्हणून जनतेच्या बाजूने उभा आहे प्रसंगी लोकशाही मार्गाने रुळावर झोपून आंदोलन करावे लागले. तरी करेन अशी याची ग्वाही आमदार कांदे यांनी दिली.  

सात गाड्यांपैकी कोणत्याही दोन एक्सप्रेस गाड्याना थांबा मिळवून देण्याची तयारी त्यांनी  दाखवली. महानगरी, काशी व कामयानी अशा तीन गाड्यांचे थांबे द्यावेत अशी मागणी सुमित सोनवणे यांनी केली. कोरोनाचा धोका कमी झाल्यावर सर्व गाड्यांचे थांबे पूर्ववत व्हावेत अशी मागणी नागरिकांनी केली.
...     

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख