जिल्हाधिका-यांचे पाकीट मारले...पोलिसांनी संशयितांना पकडले...

चक्क सुरक्षा रक्षकासह वावरणारे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनाही पाकीटमाराचा अनुभव आला.चोरट्याने त्यांना हात की सफाई दाखवत पाकीट लंपास केले. त्याची शहरभर चर्चा झाली.
suraj Mandhre
suraj Mandhre

नाशिक  : लग्नसोहळे म्हटले की गर्दी आलीच. गर्दी आली की तीथे चोरटे संधी शोधणार नाही असे शक्यच नाही. त्यात व्हीआयपी लग्न म्हणजे हे हमखास घडतेच. त्याचा प्रत्यय काल चक्क सुरक्षा रक्षकासह वावरणारे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनाही बसला. चोरट्याने त्यांना हात की सफाई दाखवत पाकीट लंपास केले. त्याची शहरभर चर्चा झाली.

राष्ट्रवादी कॅांग्रेसचे निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाचा काल (रविवारी) नाशिक शहरात विवाह झाला. या विवाहाला निफाड, नाशिक शहरातील झाडून सगळ्या नेते, व्यापारी व नागरिकांनी हजेरी लावली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह विविध नेते, आमदार हजर असल्याने अधिका-यांचा राबता होताच. त्यात जिल्हाधिकारी सूरज मांढरे हे देखील आपल्या स्वीय सहाय्यक व अंगरक्षकासह हजर होते. यावेळी चोरट्याने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या पाकीटावर हात की सफाई केली. श्री. मांढरे यांना आपले पाकीट गहाळ झाल्याचे कळल्यावर त्यांनी शेजारीच उपस्थित अधिकाऱ्याला याबाबत माहिती दिली. ``माझ्या खिशात पाकीट नसल्याचे लक्षात येता मी तातडीने तिथे उपस्थित असलेल्या पोलिस उपायुक्तांच्या ते लक्षात आणून दिले व याची औपचारिक तक्रार देखील पोलीस स्टेशनला तात्काळ पाठवली. 
माझ्या पाकिटात असलेली दोन्ही बँक कार्ड  डी ऍक्टिव्हेट मी स्वतः बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधून केलेले आहेत. पाकीट ज्या ठिकाणी गहाळ झाले त्याबाबत माझ्या मते ज्या शक्यता आहेत त्या सर्व मी पोलिस अधिकाऱ्यांना सांगितल्या आहेत व ते त्याप्रमाणे तपास देखील करीत आहेत, असे मांढरे यांनी सांगितले. 

पाकिटात तीन हजार रुपये?

दरम्यान या पाकिटात तीन हजार रुपये. जिल्हाधिका-यांचे ओळखपत्र व एटीएम कार्ड होते. त्यांच्या स्वीय सहाय्यकाने  एटीएम कार्ड तातडीने बंद केले. पोलिसांनी चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न दुस-या दिवशीही केला. काही संशयितांना पकडण्यात आले आहे. सीसीटिव्ही फूटेजही पाहून पुढील तपास करण्यता येत आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com